नवी दिल्ली- सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे ट्रेंड सुरु असतात. त्यातील काही मजेशीर असताना त्यामुळे त्यांना काही गांभीर्याने घेतले जात नाही. पण, काही ट्रेंड जीवघेणे ठरु शकतात. त्यामुळे याचा गांभीर्याने विचार करणे क्रमप्राप्त ठरते. टीकटॉकवर एक क्रोमिंग नावाचा असाच एक ट्रेंड सुरु आहे. यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीला आपला जीव गमवावा लागला.
इस्त्रा हायनेस (Esra Haynes) या मुलीचे या ट्रेंडमुळेच मृत्यू झाला. घरापासून दूर जाऊन या मुलीने विषारी एअरोसोल घुंगले होते. या ट्रेंडला टीकटॉकवर क्रोमिंग म्हटलं जातं.यामुळे मुलीच्या डोक्यावर गंभीर परिणाम झाला होता. त्यानंतर तिचे हृदय बंद पडले होते. मृत्यू होण्यापूर्वी हॉस्पटलमध्ये तिच्यावर आठवडाभर उपचार सुरु होते.
इस्त्राच्या मृत्यूनंतर तिच्या आईवडिलांनी याबाबत काळजी व्यक्त केली आहे. इतर कोणासोबतही असं होऊ नये यासाठी त्यांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. माझ्या मुलीला याचे परिणाम माहिती असते तरी तिने असं कधीही केलं नसतं, असं मुलीचे वडील एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
क्रोमिंग हा सोशल मीडियावरील एक धक्कादायक ट्रेंड आहे. यात व्यक्तीने एअरोसोल स्प्रे कॅन किंवा विषारी पदार्शांच्या डब्यांना घुंगायचे असते. यामुळे थोडीशी धुंदी चढते. पण, यामुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. काही प्रकरणात जीव देखील जाऊ शकतो. विशेष करुन तरुणांमध्ये याचे परिणाम अधिक होत असल्याचं सांगण्यात येतं.
यशोदा हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार डॉक्टर दिलीप गुडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. रंगाचे डब्बे किंवा इतर कंटेनरमधून विषारी पदार्थ आतमध्ये घेणे याला क्रोमिंग म्हणतात. यामुळे थोडावेळ नशा चढल्यासारखं वाटतं. पण, कालांतराने याचे व्यसन लागते.
गुडे म्हणाले की, याचे शरीरावर गंभीर परिणाम होतात. यात मळमळ, उलटी, अंग दुखणे, झोप येणे, चक्कर, विचार करण्याची क्षमता गमावणे अशा परिणामांचा समावेश होतो. त्यामुळे सोशल मीडियावरचा नवा ट्रेंड धोकादायक ठरत आहे. काही प्रकरणांमध्ये हृदयविकाराचा झटका, रक्ताभिसरण संस्थेत बिघाड असे आजार उद्भवू शकतात. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.