Zombie Deer Disease : सध्या भारतात कोरोनाचा एक नवा व्हेरियंट आल्यामुळे चिंता वाढली आहे, तर अमेरिकेत हरिणांमध्ये पसरत चाललेल्या एका झॉम्बी व्हायरसने लोकांचं टेन्शन वाढवलं आहे. क्रॉनिक वॉशिंग डिसीज (CWD) किंवा 'झॉम्बी डिअर' डिसीज असं या आजाराला म्हटलं जात आहे. हा केवळ हरणांमध्येच नाही, तर माणसांमध्येही पसरू शकतो अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे.
अमेरिकेतील येलोस्टोन नॅशनल पार्कमध्ये (Yellowstone National Park) एका हरिणाचा मृतदेह आढळून आला होता. या हरिणाला प्रिऑन आजाराची (Prion Disease) लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या हरिणाचा मेंदू या व्हायरसमुळे पूर्णपणे डॅमेज झाला होता. अशा प्रकारे मृत्यू होणाऱ्या हरणांचं (US Zombie Deer) प्रमाण वाढत चाललं आहे. संक्रमित हरिणाचं मांस जर एखाद्या व्यक्तीने खाल्लं; तर त्यामार्फत माणसांमध्ये देखील हा विषाणू पसरू शकतो, असं म्हटलं जात आहे.
गार्डियनने दिलेल्या माहितीनुसार, प्रिऑन आजाराची लागण झालेल्या हरणांमध्ये नीट चालता न येणे, अचानक वजन कमी होणे, हालचाल मंदावणे आणि अन्य न्यूरोलॉजिकल लक्षणे (Prion Disease Symptoms) दिसतात. या लक्षणांमुळे प्राणी चित्रपटातील एखाद्या झॉम्बीप्रमाणे हालचाल करतात, त्यामुळेच याला झॉम्बी डिअर डिसीज असंही म्हटलं जातं.
हरिण किंवा अन्य प्राण्यांमध्ये ही लक्षणे तेवढी धोकादायक वाटत नसली, तरी मानवांमध्ये ही लक्षणं अत्यंत धोकादायक ठरू शकतात. सध्या प्रिऑन हा आजारा हरीण, रेनडिअर, उंदीर आणि एल्क अशा प्राण्यांमध्ये दिसून आला आहे. उत्तर अमेरिका, नॉर्वे, कॅनडा आणि दक्षिण कोरियामध्ये देखील असे संक्रमित प्राणी आढळले आहेत. (Prion Disease)
Prion हे शरीरातील कित्येक पेशींच्या पृष्ठभागावर आढळणारे प्रथिन आहे. यामध्ये काही असामान्य बदल झाल्यामुळे मेंदूमध्ये गुठळ्या होतात. परिणामी स्मरणशक्ती, हालचाल करण्याची क्षमता आणि इतर गोष्टींवर विपरित प्रभाव पडतो. सध्या मानवाला याची लागण झाल्याचं एकही प्रकरण समोर आलेलं नाही. मात्र, याबाबत खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.