Lebanese pagers explosions: कोणी कल्पनाही केली नसेल अशा प्रकारचा हल्ला लेबनॉनमधील हिजबोल्लाहाच्या दहशतवाद्यांवर करण्यात आला आहे. लेबनॉन आणि सीरियातील अनेक शहरांमध्ये हिजबोल्लाहच्या अनेक सदस्यांच्या पेजर्समध्ये स्फोट झाला आहे. हा एक वेगळ्या प्रकारचा हल्ला होता. यात आतापर्यंत ११ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ४ हजार लोकांपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत.
हल्ल्यामागे इस्त्राईलची गुप्तचर संघटना मोसाद असल्याचा संशय लेबनॉनने व्यक्त केला आहे. हा हल्ला कसा शक्य झाला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंदर्भातील आपण काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.