World Disabilities Day 2023 : का साजरा केला जातो 'जागतिक अपंग दिन', जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

'जागतिक अपंग दिन' आजच का साजरा केला जातो?
World Disabilities Day 2023 : का साजरा केला जातो 'जागतिक अपंग दिन', जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व
Updated on

आज जागतिक दिव्यांग दिन. हा दिवस दरवर्षी ३ डिसेंबर १९९२ पासून जगभरात साजरा केला जातो. अपंग लोकांना त्यांच्या हक्कांविषयी सांगणे आणि इतर लोकांना त्याची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे. 

समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींचे हक्क आणि कल्याण साधलं जावं, या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. विशेष म्हणजे एकूण दिव्यांग लोकसंख्येपैकी तब्बल 80 टक्के लोक विकसनशील देशांमध्ये राहतात.

जगभरातील एकूण दिव्यांगांमध्ये लहान मुलांची संख्या 100 दशलक्षाहून अधिक आहे. आरोग्य, सामाजिक आणि आर्थिक यांसारख्या जागतिक समस्यांचा मोठा परिणाम दिव्यांग लोकांवर होत असतो.

सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये अपंग व्यक्तींना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता वाढवण्याच्या उद्देशाने 1992 मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या ठराव 47/3 मतांनी मंजूर झाला आणि दरवर्षी 3 डिसेंबरला आंतराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा केला जाऊ लागला.

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिवसाचे महत्त्व

आरोग्याच्या समस्या, शिक्षणातील समान संधींचा अभाव आणि बऱ्याचदा कामात होणार त्रास या गोष्टींचा दिव्यांगाना सतत सामना करावा लागतो, यामुळे त्यांच्या जीवनशैलीवर तसेच शारीरिक आरोग्यावरही परिणाम होतो. म्हणूनच, जगाला त्यांच्या समस्यांबद्दल जागरूक करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी समाजात पूरक वातावरण निर्मिती करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

जागतिक अपंग दिनाचा इतिहास -

जागतिक अपंग दिनाला संयुक्त राष्ट्रांनी १९९२ मध्ये प्रोत्साहन दिले होते.विकलांगलोकांचे हक्क, आदर आणि काळजी यांविषयी लोकांना अधिक जागरूक करणे तसेच अपंग व्यक्तींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे हा या दिवसाचा उद्देश होता.

अपंग व्यक्तींना आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाच्या प्रत्येक पैलूचे फायदे सांगणे हा या दिवसाचा उद्देश आहे. हे शारीरिक अपंगत्वाशी संबंधित नाही, परंतु ऑटिझमपासून डाऊन सिंड्रोम आणि मल्टीपल स्क्लेरोसिसपर्यंत सर्व अपंगत्वांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.