नवी दिल्ली- इस्राइल आणि हमासमध्ये तुंबळ युद्ध सुरु आहे. अशात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांचे पुत्र कुठे आहेत असा प्रश्न विचारला जात आहे. कारण पंतप्रधानांचे पुत्र यायीर नेतान्याहू हे देशात नसून अमेरिकेत मजा करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या मुद्द्यावरुन नेतान्याहू यांच्यावर टीकाही होत आहे. (Where is he Benjamin Netanyahu son Yair stays in US amid Israel Hamas war)
हमास या अतिरेकी संघटनेने इस्राइलवर ७ ऑक्टोंबरला हल्ला केला. हल्ला अत्यंत भीषण होता. त्यामुळे संपूर्ण जग स्तब्ध झाले होते. त्यानंतर जवळपास चार लाख इस्राइली तरुण युद्धात सहभागी झाले आहेत. अशाच पंतप्रधानांचे पुत्र किमान देशात तरी का नाहीत? असा प्रश्न नागरिकांना पडणे साहजिक आहे.
इस्राइल आणि हमाच्या युद्धात आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त इस्राइली नागरिकांचा मृत्यू झालाय. तर गाझा पट्टीतील ५ हजारांपेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झालाय. २० हजारांपेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. अशा संकटाच्या स्थितीत यायीर हे मियामीच्या बीचचा आनंद घेत असल्याचा एक फोटो समोर आला होता. त्यामुळे जनतेमध्ये रोष निर्माण झाला आहे.
इस्राइलमध्ये युद्धाला तोंड फुटल्यानंतर अनेक तरुण मायदेशी परत आले असून त्यांनी हाती शस्त्र घेतले आहेत. इतर देशातील आपले कुटुंब आणि आपली नोकरी सोडून हे तरुण फक्त मायदेशावरील प्रेमापोटी परत आले आहेत. त्यामुळे पंतप्रधानांचा मुलगा देशाबाहेर आनंदात राहत असल्याचं समजल्याने टीका होऊ लागली आहे.
युद्धात सहभागी एका इस्राइली तरुणाने म्हटलं की, 'यायीर मियामीच्या बीचवर मजा करत आहे आणि मी इथे युद्धात सर्वात पुढे उभा आहे. आम्ही आहोत ज्यांनी आपलं काम, कुटुंब, मुलं सोडून देशाच्या संरक्षणासाठी परत आलो आहोत.'
दुसऱ्या एकाने म्हटलं की, मी अमेरिकेतून आलोय. माझी नोकरी, घर, कुटुंब तेथे आहे. पण, मी माझ्या देशाला एकटं सोडू शकत नाही.अशा संकटाच्या परिस्थितीत मी माझ्या देशवासियांना एकटं सोडणार नाही. पण, पंतप्रधानांचा मुलगा कोठे आहे. तो देशात का नाही? (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.