जागतिक आरोग्य संघटना सक्रिय; विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटनशी संपर्क

जागतिक आरोग्य संघटना सक्रिय; विषाणूच्या नव्या प्रकाराबाबत ब्रिटनशी संपर्क
Updated on

लंडन - कोरोना विषाणूचा जास्त वेगाने आणि सहजतेने पसरणारा नवा प्रकार ब्रिटनमध्ये आढळल्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (डब्लूएचएओ) सक्रिय झाली आहे.  ब्रिटनमधील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी दिलेली माहिती आशादायक आहे. हा प्रकार संसर्गाच्या बाबतीत ७० टक्के जास्त तीव्र आहे, पण तो तेवढा घातक मानला जात नसून लस परिणामकारक ठरली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

या पार्श्वभूमीवर डब्लूएचओने निवेदन जारी केले. ब्रिटनमधील अधिकारी विषाणूचे परीक्षण आणि सध्या सुरू असलेल्या अभ्यासाबाबत माहिती आणि आकडेवारी देत राहतील. त्यानुसार विषाणूच्या प्रकाराचे स्वरूप आणि त्याचे काही परिणाम होत असल्यास तशी माहिती आम्ही सदस्य देश आणि जनतेला वेळोवेळी देऊ

पाच लाख लोकांना डोस
लंडनमध्ये आतापर्यंत साडेतीन लाख लोकांना कोरोना लशीचा डोस देण्यात आला असून रविवारपर्यंत ही संख्या पाच लाखाच्या घरात असेल, अशी माहिती आरोग्य मंत्री मॅट हॅनकॉक यांनी दिली. संसर्गाचे प्रमाण तीव्र असलेल्या भागांतील माध्यमिक शाळा टप्प्याटप्प्याने उघडल्या जातील. नव्या सामुहिक चाचण्यांची यंत्रणा बसविली जात असून त्यानुसार हा निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विधान चुकल्याची कबुली
वर्षाअखेरपर्यंत लाखो लोकांचे लसीकरण झालेले असेल असे हॅनकॉक अलिकडेच म्हणाले होते, मात्र हे विधान चुकल्याची कबुली त्यांनी दिली. ब्रिटनमध्ये वितरण होणाऱ्या डोसच्या संख्येशी याचा संदर्भ होता असे त्यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या जागतिक साथीच्या कालावधीत कोणतीही शक्यता फेटाळायची नाही हाच धडा मी घेतला आहे.
- मॅट हॅनकॉक,  ब्रिटनचे आरोग्य मंत्री

कुटुंबे, व्यवसायांना धक्का
लंडनमध्ये लॉकडाऊनचा निर्णय अखेरच्या क्षणी झाल्यामुळे कुटुंबे तसेच व्यवसायांना मोठा धक्का बसल्याचे महापौर सादीक खान यांनी सांगितले. ते म्हणाले की, निर्बंधांच्या बाबतीत असे सतत बदल होणे आणि व्यवसाय चालू-बंद होत राहण्याने लंडनवासीयांमध्ये संतापाची आणि नैराश्याची भावना निर्माण झाली आहे, मात्र सरकारच्या नियमांचे जनतेने पालन करणे आवश्यक आहे असे आवाहन मी करतो.

नेदरलँड््सकडून विमानांवर बंदी
ब्रिटनहून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर बंदी घालण्याचा निर्णय नेदरलँड््स सरकारने रविवारी जाहीर केला. एक जानेवारीपर्यंत तो लागू असेल. विषाणूचा नवा प्रकार जास्त घातक असून तो सहजतेने आणि वेगाने पसरतो तसेच त्याचे निदान जास्त अवघड आहे. अशावेळी प्रवाशांच्या हालचालींवर मर्यादा घालणे तसेच नियंत्रण ठेवणे शक्य तेवढ्या प्रमाणावर करणे गरजेचे आहे, असे आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे पंतप्रधान मार्क रुत्ते यांच्या मंत्रीमंडळाने खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला आहे. अत्यंत अनिवार्य असेल तरच नागरिकांनी प्रवास करावा, असे आवाहन  रुत्ते यांनी केले. नेदरलँड््समध्ये पाच आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागू आहे, जे जानेवारीच्या मध्यापर्यंत चालेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.