Corona : आली समीप घटिका; कोरोना महामारीबाबत WHO प्रमुखांचं मोठं विधान

ल्या दोन वर्षांपासून हैराण करून सोडलेल्या कोरोना महामारीचा अंत कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
corona virus
corona virus esakal
Updated on

WHO Chief On Corona : गेल्या दोन वर्षांपासून हैराण करून सोडलेल्या कोरोना महामारीचा अंत कधी होणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अखेर या प्रश्नावर जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रोस ए. गेब्रेयसस यांनी दिलासा देणारी बातमी दिली आहे. गेल्या आठवड्यातील कोरोनाच्या आकडेवारीनुसार जगातून कोरोना महामारीचा अंत दिसू लागला आहे, असे विधान टेड्रोस यांनी केले आहे. जिनिव्हा येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महामारीचा अंत करण्यासाठी संपूर्ण जग कधीही चांगल्या स्थितीत नव्हते. अद्यापही आपण त्या स्थितीत नाही. मात्र, आता या महामारीचा शेवट दृष्टीक्षेपात आहे.

डॉ. टेड्रोस म्हणाले की, गेल्या आठवड्यात जगभरातील कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची संख्या मार्च 2020 नंतरच्या साथीच्या आजाराती सर्वात कमी आहे. त्यामुळे दोन वर्षांहून अधिक काळ सुरू असलेल्या जागतिक महामारीच्या उद्रेकात हे एक महत्त्वपूर्ण वळण असू शकते असे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले आहे.

corona virus
Bjp Leader : माझ्या शरीराला स्पर्श करू नका. मी पुरुष...भाजप नेत्याचे विधान चर्चेत

कोरोनाला रोखण्यासाठी जग सक्षम नसले तरी, आता कोरोनाचा अंत दिसू लागला आहे. यावेळी त्यांनी कोरोना महामारी आणि मॅरेथॉनमध्ये प्रयत्न करणाऱ्या खेळाडूची तुलना करत या महामारीचा अंतिम रेषा आता जवळ आल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, आता कठोर परिश्रम करण्याची आणि सीमा रेषा ओलांडण्याची वेळ आली आहे. यामध्ये आपण नक्कीच यशस्वी होऊ असा विश्वासही डॉ. टेड्रोस यांनी व्यक्त केला आहे.

corona virus
Corona Test App : आता आवाज ऐकून होणार कोरोना टेस्ट; वैज्ञानिकांनी केला दावा

गेल्या आठवड्यात मृत्यूमध्ये 22% घसरण

युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने प्रकाशित केलेल्या अहवालात गेल्या आठवड्यात कोरोना मृत्युंमध्ये 22 टक्के घट झाल्याचे म्हटले आहे. ही आकडेवारी जगात 11 हजार एवढी असून, नव्या बाधितांची संख्या जगभरात 31 लाख आहे. ही आकडेवारी एकूण रूग्णसंख्येच्या तुलनेत 28 टक्क्यांनी कमी असल्याचे या अहवालात नमुद करण्यात आले आहे. कोरोनाची जगभरातील रूग्णसंख्या कमी जरी होत असली तरी, अनेक देशांमध्ये कोरोनाचे नियमांना केराची टोपली दाखवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

corona virus
खरंच समलैंगिकांनाच होते का Monkeypoxचे संक्रमण? WHO चा धक्कादायक खुलासा

Omicron चे BA.5 व्हेरिएंटचे सर्वाधिक प्रकरणे

जागतिक आरोग्य संघनेने दिलेल्या एका अहवालात ओमिक्रॉन आणि BA.5 च्या नव्या रूग्णांची झपाट्याने वाढ होत आहे. यामध्ये जगातील सर्वात डेटाबेससह सामायिक केलेल्या सुमारे 90% व्हायरसचे नमुने समाविष्ट आहेत. अलिकडच्या आठवड्यात युरोप, यू.एस. आणि इतरत्र नियामक प्राधिकरणाने BA.5 मूळ व्हेरिएंट आणि त्यापासून नव्याने तयार होणाऱ्या उपप्रकारांना नियंत्रित करणाऱ्या ट्वीक लसींना मान्यता दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.