Monkeypox : 'गे' सेक्समुळं खरंच मंकीपॉक्स होतो का? WHOनं दिलं स्पष्टीकरण

मंकीपॉक्सचा संसर्ग कोणालाही होऊ शकतो. मात्र, त्याचं असुरक्षित सेक्स कनेक्शन असल्याचीही चर्चा होती.
LGBTQ
LGBTQesakal
Updated on

Monkeypox Outbreak : कोरोनानंतर आता मंकिपॉक्स या आजारानं जगात थैमान घालायला सुरुवात केली आहे. दरम्यान, गे आणि एलजीबीटीक्यू लोकांमधील असुरक्षित सेक्समुळं हा आजार पसरत असल्याचा दावा करण्यात आला होता. पण जागतीक आरोग्य संघटनेनं हा दावा खोडून काढला असून हा खोडसाळपणा असल्याचं म्हटलं आहे. यापूर्वी डब्ल्यूएचओनं एलजीबीटीक्यू समुदायांमध्ये असलेल्या आरोग्य क्लिनिकमध्ये मांकीपॉक्सची काही प्रकरणे नोंदवली गेल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर या चर्चेला सुरुवात झाली. (WHO dispels hoax on monkeypox link with gay sex)

LGBTQ
...तर उद्धव ठाकरेंची पण चौकशी करा; रवी राणांची खळबळजनक मागणी

WHO नं आपल्या सार्वजनिक आरोग्य सल्ल्यामध्ये म्हटलं की, "मंकीपॉक्सचा धोका पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्या पुरूषांपुरता अर्थात गे व्यक्तींपुरताच मर्यादित नाही, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. संसर्गजन्य असलेल्या एखाद्या व्यक्तीशी जवळचा संपर्क असलेल्या कोणालाही याच्या संसर्गाचा धोका असतो. तथापि, मंकीपॉक्सबद्दलची कारण जेवढी लवकरात लवकर सुनिश्चित होईल तितक्या कमी लोकांवर त्याचा परिणाम होईल आणि त्याचा प्रादुर्भाव थांबवला जाऊ शकेल"

LGBTQ
Sanjay Raut ED Custody : संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

डब्ल्यूएचओच्या स्पष्टीकरणानुसार, "मंकीपॉक्स कोणत्याही लैंगिक प्रवृत्ती किंवा वंशाबाबतचा विषय नसून संसर्गबाधित जवळच्या व्यक्तीच्या संपर्कातून पसरू शकतो. त्यामुळं LGBTQs मंकीपॉक्सचे 'स्प्रेडर' नाहीत. या आजाराची लक्षणं असलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुमचा जवळचा शारीरिक संपर्क असल्यास तुम्हाला मंकीपॉक्स होऊ शकतो. लैंगिक संबंधादरम्यान त्वचेच्या संपर्कामुळं हा आजार पसरू शकतो. ज्या व्यक्तीमध्ये याची लक्षणे आहेत अशा व्यक्तीशी चुंबन घेणे, स्पर्श करणे या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळं मंकिपॉक्सची लक्षणं असलेल्या कोणाशीही जवळचा संपर्क टाळा"

LGBTQ
अशोक चव्हाण भाजपत जाणार का? स्वत: दिलं स्पष्टीकरण; म्हणाले...

नुकत्याच झालेल्या मंकीपॉक्सच्या उद्रेकानं LGBTQ समुदायामध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. याआधी, जेव्हा मंकीपॉक्सची पहिली केस नोंदवली गेली तेव्हा असे म्हटले गेलं होतं की, हा लहान मुलांमध्ये आढळणारा आजार आहे. नंतर प्राइड मंथच्या उत्सवादरम्यान LGBTQ समुदायातील लोकांमध्ये जवळचा संपर्क झाला आणि मंकीपॉक्सची आणखी काही प्रकरणे नोंदवली गेली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()