शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO चं आवाहन

शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO चं आवाहन
Updated on

दीड वर्षांपासून कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलं होतं. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोरोनाचा विळखा सैल करण्यासाठी लॉकडाउन करण्याचा निर्णय जगातील सर्व देशांनी घेतला होता. परिणामी शाळासह सर्व जग्ग ठप्प झालं होतं. आता परिस्थिती पूर्वरत होत आहे. कोरोनावर लसही उपलब्ध झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळा कधी सुरु होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका पाहाता शाळा आताच सुरु कराव्या का? असा विचार काही देश करत आहेत. पण जागतिक आरोग्य संघटनेनं शाळा सुरु करण्याचं आवाहन केलं आहे. डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी आपल्या ट्विटरवरुन केलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी जगभरातल्या देशांनी शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन केलं आहे. मागील दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. आता शाळा सुरु न झाल्यास मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्यायला हवं, असे त्या म्हणाल्या आहेत.

शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO चं आवाहन
धक्कादायक! भाजप नेत्याला गाडीच्या डिग्गीमध्ये जिवंत जाळलं

कोरोना विषयक नियमावली तयार करुन शाळा सुरु करण्यास प्राधान्य द्यायला हवं, 'असं मत स्वामीनाथन यांनी व्यक्त केलं आहे. त्या म्हणाल्या की, गेल्या काही दिवसांपासून शाळा बंद आहेत. याचा परिणाण मुलांवर नक्कीच झाला असेल. आपण आणखी विलंब केल्यास मुलांच्या मानसिक, शारीरिक आणि नव्या गोष्टी शिकण्याच्या क्षमतेवर दीर्घकालीन परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर,अंतर्गत गर्दी टाळणे, हाताची स्वच्छता ठेवणे आणि शिक्षकांचे लसीकरण या गोष्टींसह शाळा सुरु करण्यासाठी प्राथमिकता द्यायला हवी.'

शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO चं आवाहन
सोनं गाठणार प्रति तोळा एक लाखांचा टप्पा; कधी ते जाणून घ्या?

मार्च 2020 पासून भारतामध्ये शाळा बंद आहेत. पण काही राज्यांनी शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्टामध्येही 17 ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते सातवीचे आणि शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग १७ ऑगस्टपासून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे शहरातील कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरू करण्याबाबत संबंधित महापालिका आयुक्त निर्णय घेतील. तसेच कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, नगर, बीड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघरसह अन्य जिल्ह्यांतील शाळांबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

शाळा सुरु करण्याला प्राधान्य द्या; WHO चं आवाहन
मोदी सरकारने कलम 370 सारखं धाडस मराठा आरक्षणावेळी दाखवावं!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.