HAMAS : हमास संघटनेत २७ हजार दहशतवादी

टाइम्स ऑफ इस्राईलच्या मते, हमास संघटनेत सुमारे २७ हजार दहशतवादी आहेत. त्यांना सहा प्रादेशिक ब्रिगेडमध्ये विभागले आहे.
who is hamas the militant group attack on israel 27 thousand terrorists in Hamas
who is hamas the militant group attack on israel 27 thousand terrorists in Hamas Sakal
Updated on

टाइम्स ऑफ इस्राईलच्या मते, हमास संघटनेत सुमारे २७ हजार दहशतवादी आहेत. त्यांना सहा प्रादेशिक ब्रिगेडमध्ये विभागले आहे. त्याच्या २५ बटालियन आहेत आणि १०६ तुकड्या आहेत. त्यांचे कमांडर सतत बदलत राहतात. ‘हमास’मध्ये चार ‘विंग आहेत. मिलिट्री विंगचे चीफ अद दीन अल कासिम आहेत. राजकीय विंगचे प्रमुख इस्माईल हानिया आहेत. या विंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुसा अबु मरजूक आहे.

आणखी एक नेता खालिद मशाला हा आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहारासाठी ही संघटना ‘मुस्लिम ब्रदरहुड’वर अवलंबून आहे. त्यांचा सोशल विंग देखील आहे. पॅलेस्टिनी नागरिकबहुल असलेल्या इस्राईलच्या भागावर ताबा मिळविणे आणि एक वेगळा देश म्हणून तो नावारूपास आणणे हे या संघटनेचे ध्येय आहे. अनेक वर्षांनंतर हमासने इस्राईलला जेरीस आणले आहे. त्याचे सदस्य सामान्य लोकांत मिसळून इस्रायली सैनिकांवर हल्ले करतात. इस्राईलच्या शक्तिशाली असल्यामुळे या संघटनेला फारशी मदत मिळत नाही.

हल्ल्यासाठी ७ ऑक्टोबर का?

पॅलिस्टिनी दहशतवादी संघटना हमासने इस्राईलवर हल्ला करण्यासाठी आजचा दिवस का निवडला? यामागेही वेगळे कारण आहे. १९७३ च्या युद्धात सीरिया आणि इजिप्तकडून अचानक झालेल्या हल्ल्याने इस्त्राईलवर नामुष्की ओढविली होती. या घटनेला काल ५० वर्ष पूर्ण झालेले असताना हमासने हल्ल्यासाठी आजच्या दिवसाची निवड केल्याचे बोलले जात आहे. यादरम्यान, इस्लामिक जिहादी सशस्त्र विंगचा प्रवक्ता अबू हमजा याने टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटले, ‘‘ आम्ही या लढाईचा एक भाग आहोत. आमचे लोक विजय मिळेपर्यंत कासम ब्रिगेडमध्ये खांद्याला खांदा लावून संघर्ष करतील.’’

याचा दहशतवाद्यांना फायदा

इस्राईलने इतर आखाती देशांसोबतचे संबंध पूर्ववत करताना हमासचे तत्त्वज्ञान आता कालबाह्य झाले असल्याने त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले होते. नेमका याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतला. मध्यंतरी इस्राईलने ‘हमास’सोबत शस्त्रसंधी केली होती, याचा जबर फटका त्यांना बसल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे.

भयावह हमासच्या हल्ल्याचा निषेध करतो आणि या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहोत. आपण इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आपण इस्त्राईलला पाठिंबा दिला असून देशाच्या सुरक्षेबाबत असणारी उभय देशांतील बांधिलकी व्यक्त केली. आम्ही इस्राईलचे सरकार आणि जनता यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

- ज्यो बायडेन, अध्यक्ष अमेरिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.