शाहबाज शरीफ कोण आहेत? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदासाठी नाव चर्चेत

who is Shahbaz Sharif which may be new prime minister of Pakistan after Imran khan leaves
who is Shahbaz Sharif which may be new prime minister of Pakistan after Imran khan leaves
Updated on

सध्या पाकिस्तानमध्ये राजकीय उलथापालथ सुरु आहे. देशाचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये पीपीपी अर्थात पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी म्हणाले, लवकरच इम्रान सरकार पडेल. यानंतर शाहबाज शरीफ (Shahbaz Sharif) नवे पंतप्रधान असतील. दरम्यान अविश्वास प्रस्तावाला पाठिंबा देणारे बहुतांश विरोधी पक्ष शाहबाज शरीफ यांच्यासोबत आहेत. अशा परिस्थितीत शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पुढील पंतप्रधान होण्याची शक्यता आहे.

2018 च्या सार्वत्रिक निवडणुकीत शाहबाज यांना पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (PML-N) ने पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले होते. मात्र, त्यानंतर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (पीटीआय) निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला.

शाहबाज शरीफ यांचे पूर्ण नाव मियां मुहम्मद शाहबाज शरीफ आहे. त्यांचा जन्म 23 सप्टेंबर 1951 ला लाहोरमध्ये झाला. मोठा भाऊ नवाझ शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान राहिले आहेत. सध्या शाहबाज हे पाकिस्तानच्या संसदेत विरोधी पक्षनेते आहेत. ते पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत.

who is Shahbaz Sharif which may be new prime minister of Pakistan after Imran khan leaves
रेडमीचे तीन नवे स्वस्तात मस्त 5G फोन लॉंच; पाहा किंमती अन् फीचर्स

फाळणीच्या वेळी पाकिस्तानात..

शाहबाजचे वडील मियां मुहम्मद शरीफ हे व्यापारी होते. ते काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील रहिवासी होते. तर त्यांची आई पुलवामा येथील रहिवासी होती. भारत-पाक फाळणीच्या वेळी शाहबाज यांचे वडील पाकिस्तानात गेले होते.

नवाझ शरीफ यांच्याशिवाय शाहबाज यांचा आणखी एक मोठा भाऊ अब्बास शरीफ आहे. तर शाहबाज यांनी 1973 मध्ये चुलत बहीण नुसरत शाहबाज यांच्याशी लग्न केले. त्यांना सलमान, हमजा, जवेरिया आणि राबिया अशी चार मुले आहेत. 2003 मध्ये शाहबाजने तेहमीना दुर्राणीसोबत दुसरे लग्न केले.

who is Shahbaz Sharif which may be new prime minister of Pakistan after Imran khan leaves
लष्करप्रमुखांच्या भेटीनंतर इम्रान खान यांचे भाषण रद्द; अनेक चर्चा

राजकीय कारकिर्द

  • शाहबाज यांनी लाहोरमधील सरकारी महाविद्यालयात शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक म्हणून करिअरला सुरुवात केली.

  • 1985 मध्ये ते लाहोर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनले. येथून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

  • 1987 मध्ये त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला. 1988 मध्ये पहिली निवडणूक लढवली आणि जिंकली.

  • 1997 मध्ये ते पहिल्यांदाच पाकिस्तानच्या पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2008 आणि 2013 मध्ये ते पुन्हा मुख्यमंत्री झाले.

  • 2018 मध्ये, पाकिस्तान मुस्लिम लीगची कमान हाती घेतली आणि अध्यक्ष बनले.

  • 2018 च्या निवडणुकीत पराभवानंतर त्यांची संसदेतील विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.

  • तुरुंगवास देखील भोगला

  • 2020 मध्ये, ते मनी लॉन्ड्रिंगच्या एका प्रकरणात तुरुंगातही गेले आहेत. 2021 मध्ये त्यांना जामीन मिळाला होता. तेव्हा राजकीय द्वेषामुळे आपल्याला गोवण्यात येत असल्याचे शाहबाज म्हणाले होते.

who is Shahbaz Sharif which may be new prime minister of Pakistan after Imran khan leaves
Apple कंपनीचा मोठा निर्णय; आता चोरीला गेलेला iPhone ठरणार निरुपयोगी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()