Parag Agrawal's Marriage & Family Life: मायक्रोब्लॉगिग वेबसाईट ट्विटरच्या सहसंस्थापक जॅक डार्सी(jack doresey) यांनी सोमवारी सीईओ पदावरून राजीनामा दिला. ट्विटरचे नवीन सीईओ आता भारतीय वंशाचे पराग अग्रवाल होणार आहे. याआधी पराग कंपनीमध्ये चीफ टेक्नोलॉडी ऑफिसर म्हणून कार्यरत होते. पराग IIT Bombay येथून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना याहू आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्यांमध्ये काम केल्यानंतर 2011 साली ट्विटर जॉईन केले होते.
ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांच्या वैयक्तित आयुष्याबाबत सांगायचे झाले ते त्यांनी आपली लॉन्ग टाईम पार्टनर विनीता अग्रवाल यांच्याशी लग्न केले आहे. पराग आणि विनिता ने ऑक्टोबर 2015 मध्ये साखरपूडा केल्यानंतर जानेवारी 2016 मध्ये लग्न केले आहे. दोघे कॅलिफॉर्नियातील सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये राहतात. त्यांना अंश नावाचा एक मुलगाही आहे.
विनीता अग्रवालच्या ट्विटर प्रोफाईलनुसार, त्यांनी स्टॅनफॉर्ड स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये फिजिशियन आमि सहायक क्लिनिकल प्रोफेसर आहे. त्यांनी स्टॅनफॉर्ड यूनिवर्सिटी आणि हॉर्वड युनिवर्सिटीमध्ये शिक्षण घेतले आहे. त्याशिवाय विनिताने मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये पीएचडी केली आहे. विनिता बिगहॅट बायोसायन्ससह काम करत आहे. विनिताने मेडिकल आणि टेक्निकल फील्डमध्ये आतापर्यंत खूप काम केले आहे.
यापूर्वी विनिता फ्लॅटिरॉन हेल्थमध्ये प्रॉडक्ट मॅनेजमेंट डायरेक्टरच्या म्हणून कार्यरत होते. विनिताने इंस्टि्ट्यूट ऑफ हार्वड एन्ड एमआयटीने जेनेटिक बेसिस ऑफ कॉमन डिसीजचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी कोल्ड स्प्रिंग हार्बर लॅबोरेटरी एन्ड लॉरेन्स लीव्हमोर नॅशनल लॅबोरेटरीतील कॉम्युटेशनल रिसर्च देखील केला आहे.
आपल्या सोशल मीडिया अकाऊंटसवर पराग नेहमी पत्नी विनितासह फोटो अपलोड करत असतात. पराग यांचे इन्स्टा प्रोफाईल पाहून वाटते की त्यांना हिंडण्या-फिरण्याची खूप हौस आहे. त्यांनी पत्नी विनितासह सुंदर ठिकाणावरील फोटो पोस्ट केले आहेत. इंस्टाग्रामवर पराने आपल्या आई-वडिलांचा फोटोही शेअर केला आहे.
पराग यांचा जन्म आणि पालनपोषन भारतामध्ये झाले आहे. आईआईट, बॉम्बेमधून शिक्षण घेतल्यानंतर परागने करीअर बनविण्यासाठी अमेरिकामध्ये गेले. त्यांनी बीटेक इंजीनियरिंगचे शिक्षण घेतले आहे. अमेरिका गेल्यानंतर परागने स्टॅनफॉर्ड यूनिवर्सिटीमधून पीएचडीदेखील केली आहे. याच युनिवर्सिटीमध्ये विनिताने शिक्षण घेतले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.