Malaria : मलेरियाच्या उपचारासाठी 'या' व्हॅक्सिनचा वापर करा; WHOच्या सूचना

Vaccine For Malaria: R-21 म्हणजेच मॅट्रीक्स-एम या व्हॅक्सिनचा वापर मलेरियाग्रस्त लहान मुलांच्या उपचारामध्ये करावा, असं WHOच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.
malaria
malariasakal
Updated on

WHO Recommends Vaccine For Malaria: वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO)ने लहान मुलांमध्ये मलेरियाचा नायनाट कऱण्यासाठी नविन व्हॅक्सिन वापरण्याचा सल्ला दिला आहे. R-21 म्हणजेच मॅट्रीक्स-एम या व्हॅक्सिनचा वापर मलेरियाग्रस्त लहान मुलांच्या उपचारामध्ये करावा, असं WHOच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं.

WHOच्या स्ट्रॅटजिक एडवायजरी ग्रुप ऑफ एक्स्पर्ट्स (SAGE) आणि मलेरिया पॉलिसी एडवाजरी ग्रुप (MPAG)ने या सूचना जाहीर केल्या आहेत. WHOची द्विवार्षिक बैठक २५ ते २९ सप्टेंबर या दरम्यान पार पडली. या बैठकीत त्यांनी SAGE आणि MPAGने दिलेल्या सल्ल्यांना मान्यता दिली.

WHOने मलेरिया बरोबरच मेनिंजाईटीस (Meningitis) आणि डेंग्यू यांसारख्या रोगांवर देखील नवीन लस वापरण्याच्या सूचना SAGEच्या सल्ल्यावरुन दिल्या आहेत. पोलियोचा नायनाट करण्यासाठी IA2030 लशीचा वापर वाढवावा असं सांगण्यात आलं.

WHOकडून सुचवण्यात आलेली R-21 ही दुसरी लस आहे. याआधी RTS,S/AS01 ही लस मलेरियासाठी देण्यात येत होती, २०२१मध्ये ही लस वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. WHOने सुचवलेल्या लशी लहान मुलांसाठी सुरक्षित आणि परिणामकारक आहेत. जेव्हा या लशीमुळे लोकांच्या आरोग्यावर चांगला परिणाम बघायला मिळाला होता.(Latest Marathi News)

malaria
Sundar Pichai : गुगल भारतात बनवणार 'क्रोमबुक'! आयटी राज्यमंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत

मलेरिया हा मच्छारांमुळे उद्भवणारा रोग आहे. आफ्रिकन देशांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. येथील सुमारे ५ लाख लहान मुलं या रोगामुळे जीव गमावतात. असे WHOकडून प्रकाशित करण्यात आले होते.

या देशांमध्ये मलेरियाच्या लशींची मागणी जास्त आहे. मात्र, या लशींचा पुरवठा मर्यादित आहे.WHOने शिफारस केलेल्या मलेरिया लशींच्या यादीत R21 समाविष्ट केल्यामुळे ज्या ठिकाणी मलेरियाचा प्रादुर्भाव जास्त आहे, अशा ठिकाणी पुरवठा होण्याची अपेक्षा आहे. (Latest Marathi News)

malaria
R.Ashwin:'आश्विन स्वार्थी खेळाडू, तो फक्त...', भारताच्या माजी दिग्गजाने आरोप करत ओढले ताशेरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()