Pakistan Terrorist Death: १५० लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार असणारा दहशतवादी; कोण आहे अब्दुल सलाम?
दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक सदस्य आणि दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी याचा पाकिस्तानच्या तुरुंगात मृत्यू झाला आहे. ही पुष्टी 7 महिन्यांनंतर झाली आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, हाफिज अब्दुल सलाम भुट्टावी हा हाफिज सईदचा सहायक होता आणि त्याने मुंबई हल्ल्यात सहभागी असलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यात भूमिका बजावली होती.
भारताच्या आणखी एका शत्रूचा खात्मा झाला आहे. UNSC ने देखील या बातमीला दुजोरा दिला आहे. लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक हाफिज अब्दुल सलाम भुट्टावीचा मृत्यू झाला आहे. मुंबई हल्ल्यातही त्याचे नाव समोर आले आहे. भुट्टावी हा भारताच्या मोस्ट वॉण्टेड यादीत समाविष्ट असलेला दहशतवादी हाफिज सईदचा डेप्युटीही होता. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात येत आहे.
वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले तेव्हा भुट्टावीने किमान दोन वेळा लष्कर-ए-तैयबा आणि जमात-उद-दावाचा काळजीवाहू म्हणून काम केले होते.
नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यानंतर काही दिवसांनी हाफिज सईदला नजरकैदेत ठेवण्यात आले होते आणि जून 2009 पर्यंत तो कोठडीत ठेवण्यात आला होता. या काळात भुट्टावी यांनी गटाचे दैनंदिन कामकाज हाताळले आणि संस्थेच्या वतीने स्वतंत्र निर्णय घेतले. हाफिज सईदलाही मे 2002 मध्ये ताब्यात घेण्यात आले होते.
कोण होता भुट्टावी?
UNSCने दिलेल्या माहितीनुसार भुट्टावी याचा मृत्यू 29 मे 2023 रोजी झाला. जेव्हा तो पाकिस्तानातील तुरुंगात शिक्षा भोगत होता. 26/11 चा मास्टरमाइंड हाफिज सईदला ताब्यात घेण्यात आले तेव्हा भुट्टावी लष्कराची कमान सांभाळत होता. मुंबई हल्ल्यातही त्याचा मोठा वाटा होता.
नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या मुंबई हल्ल्यासाठी त्यांनी व्याख्याने देऊन दहशतवाद्यांना तयार केले. भुट्टावीने लष्करचे मदरसा नेटवर्कही चालवले. 2002 च्या सुमारास त्याला पाकिस्तानातील लाहोरमध्ये लष्कराचा तळ तयार करण्याची जबाबदारीही देण्यात आली होती. UNSC ने भुट्टावीला २०१२ मध्ये दहशतवादी घोषित केले होते.
विशेष म्हणजे लष्कराशी संबंधित काही संघटनांनी गेल्या वर्षी मे महिन्यात एक व्हिडिओही जारी केला होता. हा व्हिडिओ कथितपणे भुट्टावीच्या अंत्यसंस्काराचा असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबई हल्ल्याच्या नियोजनात 78 वर्षीय भुट्टावीचाही सहभाग होता. त्या काळात दीडशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी, UNSC ने देखील सईद 12 फेब्रुवारी 2020 पासून तुरुंगात असल्याची माहिती दिली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.