रोज अडीच किलो मटन अन् 10 लोकांचं जेवण... 'जनावर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बॉडीबिल्डरचे निधन; कोण होते Illia Golem Yefimchyk?

Who Was Illia Golem Yefimchyk: येफिम्चिकच्या मृत्यूपुर्वी 34 वर्षांच्या ब्रिटीश बॉडीबिल्डर नील करी आणि 26 वर्षांचा ब्राझीलचा अँटोनियो सौझा यांचेही मृत्यू झाले होते.
Illia Golem Yefimchyk
Illia Golem YefimchykEsakal
Updated on

जगातील "सर्वात राक्षसी बॉडीबिल्डर" म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या, इलिया "गोलेम" येफिम्चिक यांचे नुकतेच निधन झाले. ते 36 वर्षांचे होते. 6 सप्टेंबर रोजी घरीच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ते कोमात गेले होते.

येफिम्चिक यांच्या मृत्यूपुर्वी 34 वर्षांच्या ब्रिटीश बॉडीबिल्डर नील करी आणि 26 वर्षांचा ब्राझीलचा अँटोनियो सौझा यांचेही मृत्यू झाले होते.

बीबीसीच्या म्हणण्यानुसार, करी हे सप्टेंबर 2023 मध्ये मृत आढळले होते, त्यांच्या पालकांनी दिलेल्या माहितीनुसार करी यांनी स्टिरॉइडचा अति वापर केला होता.

दुसरीकडे एका स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवल्यानंतर 3 ऑगस्ट रोजी सौझाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.