Ebrahim Raisi: मौलवी कुटुंबात जन्म ते इराणचे अध्यक्ष, जाणून घ्या इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेपासून महिलांपर्यंतची मते

Ebrahim Raisi Helicopter Crash: महिला आणि मुलींचे स्वातंत्र्य आणि हक्काचे उल्लंघन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. महिलांच्या भूमिकेशिवाय अर्थकारण आणि संस्कृतीविषयी बोलणे अपूर्ण आहे.
Who Was Ebrahim Raisi
Who Was Ebrahim RaisiEsakal
Updated on

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा रविवारी खराब हवामानात अपघात झाला होता. बेपत्ता हेलिकॉप्टरचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शोध मोहिम राबवण्यात आली. या दरम्यान इब्राहिम रईसी यांचा मृत्यू झाल्याची बातमी आली आहे.

रईसी व्यतिरिक्त, अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दुल्लाहियन देखील होते. वरझाघन शहराजवळील डिझमारच्या डोंगराळ जंगलात हा अपघात झाला होता. (Ebrahim Raisi Death In Helicopter Crash)

रईसी यांचा सुरुवातीचा काळ

इब्राहिम रईसी यांचा जन्म 14 डिसेंबर 1960 मध्ये महशदच्या नोघन जिल्ह्यातील एका मौलवी परिवारात झाला होता. ते पाच वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता.

इब्राहिम रायसी यांनी आपले प्राथमिक शिक्षण 'जावाहियेह स्कूल'मधून पूर्ण केले. आणि त्यानंतर हौजामध्ये (इस्लामी मदरसा) पुढचे शिक्षण घेतले. 1975 मध्ये क्यूम सेमिनरीतून आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी रायसी "अयातुल्लाह बोरोजेडी स्कूल"मध्ये दाखल झाले.

रईसी यांनी मोताहारी विद्यापीठातून खाजगी कायद्यात डॉक्टरेट पूर्ण केलाचा दावा आहे. मात्र त्यांचा हा दावा विवादित आहे.

कारकिर्दीची सुरुवात

इब्राहिम रईसी यांची 1985 मध्ये इराणची राजधानी तेहरानचे उप वकील म्हणून निवड करण्यात आली. पुढे 988 मध्ये त्यांना वकील म्हणून बढती मिळाली.

1988 च्या सुरुवातीस, रईसी यांची इराण क्रांतीचे जनक आणि इराणचे संस्थापक रुहोल्लाह खोमेनी यांच्याशी भेट झाली. या भेटीत रईसी यांनी खोमेनी यांना प्रभावित केले. त्यानंतर रईसी यांना लॉरेस्तान, सेमनन आणि केर्मनशाह सारख्या काही प्रांतांमध्ये कायदेशीर समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र संस्थेचे प्रमुख केले.

महत्त्वाची पदे

रुहोल्लाह खोमेनी यांच्या मृत्यू नंतर आणि आयातुल्हा खोमेनी यांची इराणचा सर्वोच्च नेता म्हणून निवड झाल्यानंतर रईसी यांना इराणच्या सरकारकडून मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या.

इब्राहिम रईसी यांनी 2004 ते 2014 या काळात ईराणचे पहिले उपमुख्य न्यायाधीश म्हणून काम केले. 2014 मध्ये ते इराणचे महाधिवक्ता झाले. 2016 पर्यंत ते या पदावर होते.

इब्राहिम रईसी यांनी त्यांच्या कार्यकाळात सर्वोच्च सायबर सुरक्षा परिषद,मॉनेटरी अँड क्रेडिट कौन्सिल आणि भ्रष्टाचारविरोधी मुख्यालयामध्येही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Who Was Ebrahim Raisi
Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

अध्यक्षपदाची पहिल्या निवडणुकीत पराभव

देशात अनेक वर्षे महत्त्वाची पदे भूषवणाऱ्या इब्राहिम रईसी यांनी 2017 मध्ये पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इस्लामिक रिव्होल्यूशनरी फोर्सेस पक्षाकडून पहिल्यांदा इराणच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांना देशातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांचा पाठिंबा मिळाला. पण तरीही यामध्ये त्यांना पराभवास समोरे जावे लागले.

पण पुढे, 2021 मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीत इब्राहिम रईसी यांनी अखेर विजय मिळवला. पण या निवडणुकीत रायसी यांनी गैरप्रकार केल्या आरोप झाले होते.

Who Was Ebrahim Raisi
Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

समलैंगिकता आणि इब्राहिम रायसी

इराणसारख्या कट्टरतावादी देशात इब्राहिम रईसी यांची समलैंगिकतेविषयी प्रतिकुल मते होती. त्यांची याविषयी अनेक मते समलैंगिक आणि LGBTQ समुदायाविरोधात दुषित पूर्वग्रह आणि हिंसेला प्रोत्साहन देणार होती.

रायसी यांची महिलांविषयी मते

इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी एकदा म्हणाले होते की, महिला आणि मुलींचे स्वातंत्र्य आणि हक्काचे उल्लंघन करण्याचा अधिकार कोणालाही नाही. महिलांच्या भूमिकेशिवाय अर्थकारण आणि संस्कृतीविषयी बोलणे अपूर्ण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.