Ismail Haniyeh: रिफ्यूजी कॅम्पमध्ये जन्म ते हमासचा प्रमुख! इस्रायलने बदला घेतलेला इस्माइल हनीयेह कोण?

Who Was Ismail Haniyeh: इराणच्या तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माइल हनीयेह आणि त्याच्या एका अंगरक्षकाची हत्या करण्यात आली, असे पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.
Who Was Ismail Haniyeh
Who Was Ismail HaniyehEsakal
Updated on

इराणच्या तेहरानमध्ये हमास प्रमुख इस्माइल हनीयेह आणि त्याच्या एका अंगरक्षकाची हत्या करण्यात आली, असे पॅलेस्टिनी दहशतवादी संघटनेने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे.

हमासच्या म्हणण्यानुसार, इस्माइल हनीयेह तेहरानमधील त्याच्या निवासस्थानावर "विश्वासघातकी झिओनिस्ट हल्ल्यात" मारला गेला.

गेल्या वर्षी हमासने इस्रायलच्या सीमेत घुसून हल्ला केला होता. यामध्ये सुमारे 1200 जणांचा मृत्यू झाला होता. इस्रायलच्या म्हणण्यानुसार इस्माइल हनीयेह हाच या हल्ल्यामागील खरा सूत्रधार होता.

कोण होता हनीयेह?

गाझाच्या शती निर्वासित छावणीत 1963 मध्ये जन्मलेल्या इस्माइल हनीयेहने संयुक्त राष्ट्रांच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले होते. त्याने गाझा इस्लामिक विद्यापीठातून 1987 मध्ये अरबी साहित्यात पदवी प्राप्त केली. विद्यापीठात असतानाच, तो हमासमध्ये सामील झाला होता.

1987 मध्ये पॅलेस्टाईनच्या लोकांनी गाझा पट्टीत इस्रायलच्या विरोधात प्रचंड मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला 'पहिला इंतिफादा' असेही म्हणतात.

त्यावेळी इस्त्रायली सैनिक आणि पॅलेस्टिनी लोकांमध्ये भीषण संघर्ष झाला होता. या संघर्षात इस्माईल हनीयेहनेही भाग घेतला होता. त्यानंतर इस्माईल हनीयेहला इस्रायलने तुरुंगात टाकले होते.

Who Was Ismail Haniyeh
Hezbollah Top Commander Killed: इस्रायलचा बेरूतमध्ये धमाका, दोन दिवसांत घेतला बदला; हिजबुल्लाहचा टॉप कमांडर ठार

कतारमधून चालवले हमासचे नेतृत्त्व

इस्रायलने 1997 मध्ये हनीयेहची हमासच्या प्रमुखपदी नियुक्ती केली होती. पण 1989 मध्ये इस्माईल हनीयेहला इस्रायलने तीन वर्षांसाठी तुरुंगात डांबले होते. त्यानंतर हनीयेहला हमासच्या इतर नेत्यांसमवेत इस्रायल आणि लेबनॉन दरम्यान असलेल्या मार्ज अल-झहुर येथे पाठवण्यात आले.

2006 मध्ये गाझामध्ये झालेल्या निवडणुकीत हमासने विजय मिळवला आणि इस्माईल हनीयेहला पॅलेस्टिनी पंतप्रधान बनवले.

इस्माईल हनीयेह यांची 2017 मध्ये हमासच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख म्हणून निवड झाली. मात्र, त्याने कतारमधून हमासचे संपूर्ण नेटवर्क चालवले.

Who Was Ismail Haniyeh
China Secret Spacecraft : चीनने अंतराळात सोडलेल्या 'सिक्रेट' वस्तूमुळे जग चिंतेत; नेमकं काय आहे प्रकरण?

दहशतवादी

2018 मध्ये इस्माईल हनीयेहला अमेरिकेने दहशतवादी घोषित केले होते. इस्माईल हनीयेहने ऑक्टोबर २०१५ नंतर सुरू झालेल्या इस्रायल-हमास युद्धातही मोठी भूमिका बजावली होती. कतार आणि इजिप्तच्या मध्यस्थीने झालेल्या शांतता चर्चेत हानियाने हमासचे नेतृत्व केले होते.

दरम्यान गेल्या वर्षी इस्रायलवर झालेल्या हल्ल्यामागे हनीयेह मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले जाते. या हल्ल्यात इस्रायलचे 1200 लोक मारले गेले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.