पाकिस्तानमध्ये २४ तासातच बलुच अतिरेक्यांनी ५३ पंजाबी नागरिकांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एकाच दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये तब्बल ७४ लोकांचा मृत्यू झाला आहे ज्यापैकी २१ जण हे दहशतवादी होते..दक्षिण पश्चिम पाकिस्तानात वाहनातून खाली उतरवून आयडी कार्ड दाखवायला लावून किमान २३ लोकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. याची जबाबदारी देखील बलुच दहशतवादी संघटनेनेघेतली आहे. त्यांच्याकडून दीर्घ काळापासून पंजाबी नागरिकांना लक्ष्य केले जात आहे. पण या १८ वर्षांपासून चालत आलेल्या संघर्षाचे कारण काय आहे? हे आपण आज जाणून घेणार आहोत.बलुचिस्तान भागात एकाच दिवशी ७४ जणांना ठार करण्यात आले आङे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने या हल्ल्याची जबाबदारी घेतली असून त्यांना संपूर्ण प्रांतातील हायवेवर आपले नियंत्रण हवे आहे. मुसाखेल जिल्ह्याच्या राराशाम भागात सोमवारी त्यांनी तब्बल २३ लोकांना बसमधून खाली उतरवून गोळ्या घातल्या. इतकेच नाही तर किमान १० वाहनांना आग देखील लावली..Telegram Ban in India : भारतात टेलिग्राम बंद होणार? MPSC च्या विद्यार्थ्यांना बसणार मोठा फटका, नेमकं कारण काय?.यासोबतच पाकिस्तानातील शहर क्वेटा येथून सुमारे १४० किमी दूर कलातमध्ये देखील हत्यारबंद दहशतवाद्यांनी कमीत कमी १० पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या केली. बोलान जिल्ह्यात रात्री सहा लोकांना ठार करण्यात आले. यापैकी चार जण पंजाब येथील रहिवासी होते.दरम्यान पाकिस्तानी लष्कराचे म्हणणे आहे की, १४ इतर लोकांची देखील वेगवेगळ्या भागांमध्ये हत्या करण्यात आली आहे. ज्यापैकी पाच जण सुरक्षा यंत्राणांसाठी काम करतात. तर लष्कराने केलेल्या कारवाईत २१ दहशतवादी ठार झाले आहेत.बलुचिस्तान येथे यापूर्वी देखील अशा हत्या झाल्या आहेत. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बलुचिस्तान सुरक्षित नसल्याचे दाखवून देण्यासाठी या हत्या केल्या जातात. चीनी नागरिक आणि पंजाबी लोकांच्या देखील या भागात हत्या करण्यात आल्या आहेत. पंजाब आणि इतर प्रांतातून येणारे लोक घाबरून येथे येणे बंद व्हावेत यासाठी हे केले जाते. बाहेरून येणारे लोक येथील संसाधनांचे शोषन करतात अशी बलुच दहशतवाद्यांची भावना आहे. .CM Shinde : ...तरी मला गणपती मंडळाचा अध्यक्ष बनवलं; CM शिंदेंनी उलगडला रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदाचा प्रवास.एकाच दिवशी इतक्या हत्या का झाल्या?एकाच दिवशी बलुच दहशतवाद्यांनी अनेक ठिकाणी हत्या का केल्या? यासाठी एक कारण आहे. नवाब अकबर बुगतीच्या १८व्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले करण्यात आले आहेत. बुगता बलुचिस्तानचे माजी राज्यपाल आणि मुख्यमंत्री होते. २००५ मध्ये ते फुटीरतावादी चळवळीत सहभागी झाले होते आणि २००६ मध्ये एका सैन्य कारवाईत त्यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून दरवर्षी या दिवशी हल्ले केले जातात. बलुचिस्थानमधील दहशतवादी पाकिस्तानच्या सरकारला खुले आव्हान देत आले आहेत. .FASTag System : व्वा! आता रोडवर गाडी जेवढी चालवली तेवढाच द्यावा लागणार टोल! फास्टॅगच्या जागी येतंय GNSS.पाकिस्तानातील बलुचिस्तान हा सर्वात मोठा प्रांत आहे आणि येथे सुमारे दीड कोटी लोक राहातात. हा प्रांत नैसर्गिक संसाधनानी भरलेला आहे. येथे तेल, कोळसा, सोने, कॉपर आणि नॅचरल गॅसचे स्त्रोत आढळतात. बलुचिस्तानच्या संसाधनांच्या जीवावर पाकिस्तानची अर्थव्यवस्था चालते. याच प्रांतात पाकिस्तानचे महत्वाचे बंदर ग्वादर पोर्ट देखील आहे. चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर साठी हे खूप महत्वाचे आहे. मात्र बलुच लोकांचे म्हणणे आहे की पाकिस्तानचे सरकार या प्रांतातील लोकांच्या हिताचे काम करत नाही फक्त संसाधनांचे शोषन करते.अफगाणीस्तानात तालिबान परतल्यानंत पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत. २०२३ मध्ये येते ६५० हल्ले झाले होते. कोळसा आणि इतर खनिजांच्या वाहतूकीदरम्यान नेहमी दहशतवादी ट्रक थांबवून लुटमार करतात. या भागात विकासकामे नसल्याने येथे दहशतवादाची मुळे खोलवर रुजली आहेत. .ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.