Al-Aqsa मशिद अरब-इस्त्रायलमधील वादाचं कारण का ठरलीये?

Al Aqsa Mosque
Al Aqsa Mosquealjazeera
Updated on

नवी दिल्ली- इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमधील वाद पुन्हा उफाळून आला आहे. जेरुसलममधील अल-अक्सा मशिदीत प्रार्थनेसाठी आलेल्या पॅलेस्टिनी लोकांसोबत इस्त्रायल सेक्युरिटी फोर्सची झटापट झाल्याने वादाची ठिणगी पडली. जेरुसलेम शहरावर पॅलेस्टाइन आणि इस्त्रायल या दोघांचा दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. या संघर्षाला काही आठवड्यांपुर्वी पुन्हा तोंड फुटले असून वेस्ट बँक, गाझा पट्टी येथेही शेकड्यांच्या संख्येने अरब समुदायातील लोक एकत्र येत इस्राईलचा निषेध करत आहेत. गेल्या चार दिवसांपासून इस्राईलचे सैनिक या जमावावर अश्रुधुराचा मारा करतंय. यामध्ये अनेकजण अधिक जखमी झाले आहेत. (Why Jerusalem’s Aqsa Mosque is an Arab-Israeli fuse)

काय आहे अल अक्सा मशिद?

अल-अक्सा मशिद इस्लाम धर्मांमध्ये पवित्र ठिकाणांपैकी एक आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण ज्यू, इस्लाम आणि ख्रिश्चन या तिन्ही धर्माच्या लोकांसाठी पवित्र आहे. अक्सा म्हणजे दूरवरचे. असं सांगितलं जातं की, प्रेषित मोहम्मद पैंगबर एका रात्रीत मक्का ते अक्सा मशिदीपर्यंत आले होते. याच ठिकाणीहून ते स्वर्गात गेल्याचं म्हटलं जातं. आठव्या शतकात या मशिदीचे काम पूर्ण झाले होते, तेव्हापासून इस्लाम धर्मीय लोक याठिकाणी प्रार्थनेसाठी येत असतात.

Al Aqsa Mosque
इस्त्राईल-पॅलेस्टाईन पुन्हा युद्धाच्या उंबरठ्यावर

ज्यू धर्मीय या ठिकाणाला हर हबायन म्हणतात. ज्यू धर्मियांसाठी हे ठिकाण पवित्र आहे, कारण याठिकाणी दोन प्राचिन मंदिरं होती. एक किंग सोलोमनने बांधलेलं जे पुढे बेबीलोनियन्सनी उद्धवस्त केलं, दुसरं रोमन साम्राज्याने उद्धवस्त करण्याआधी पहिल्या शतकापर्यंत त्याठिकाणी उभं असणारं. युनेस्कोने ओल्ड सिटी जेरुसलम आणि त्याच्या भिंतीला जागतिक संपदा म्हणून जाहीर केलेलं आहे.

मशिदीवर कोणाचं नियंत्रण?

1967 च्या युद्धात इस्त्राईलने पूर्ण जेरुसलम ताब्यात घेतलं. त्यानंतर इस्त्राईलने जेरुसलमला आपली राजधानी म्हणून घोषित केलं. जागतिक स्तरावर याला अजून मान्यता मिळालेली नाही. सध्या या मशिदीवर वक्फ नावाच्या इस्लामिक ट्रस्टचा अधिकार आहे. जॉर्डनकडून या मशिदीला फंड दिला जातो. इस्त्राईल सेक्युरिटी फोर्स या मशिदीच्या परिसरात गस्त घालत असते. ज्यू आणि ख्रिश्चन लोकांना याठिकाणी येण्यास परवानगी आहे, पण ते मुस्लिमांप्रमाणे याठिकाणी प्रार्थना करु शकत नाहीत. याच भेदभावामुळे अनेक वर्षांपासून ज्यू नागरिकांमध्ये संताप होता. दुसरीकडे, जेरुसलमवर ताबा मिळवण्याचा दिवस इस्त्राईलकडून दरवर्षी साजरा केला जातो. यामुळे स्थानिक पॅलेस्टिनी नागरिकांमध्ये चिड आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.