Joe Biden : ट्रम्प यांच्याविरोधात लढणारच ;बायडेन,पुढील आठवड्यात प्रचाराला पुन्हा सुरुवात करणार

अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यास अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर दबाव येत असला तरी ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. निवडणुकीसाठी प्रचार सुरू ठेवणार असून प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लढणार असल्याचा पुनरुच्चार बायडेन यांनी शुक्रवारी केला.
Joe Biden
Joe Bidensakal
Updated on

वॉशिंग्टन : अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेण्यास अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर दबाव येत असला तरी ते निवडणूक लढविण्यावर ठाम आहेत. निवडणुकीसाठी प्रचार सुरू ठेवणार असून प्रतिस्पर्धी डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात लढणार असल्याचा पुनरुच्चार बायडेन यांनी शुक्रवारी केला.

बायडेन यांना कोरोनाची लागण झाली असून ते डेलवेर येथील निवासस्थानी विलगीकरणात आहेत. ते आठवडाभर विश्रांती घेणार आहेत. बायडेन यांच्या प्रचारयंत्रणेने काल एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. मिलिवाऊके येथे झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय परिषदेत ट्रम्प यांची अध्यक्षपदासाठी अधिकृत घोषणा करण्यात आली. त्याचा स्वीकार ट्रम्प यांनी केला. यानंतर दुसऱ्या प्रसिद्ध केलेल्या निवेदनात बायडेन म्हणाले,‘‘डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘प्रोजेक्ट २०२५’ या जाहीरनाम्यातील धोका सर्वांसमोर आणण्याचे काम सुरू ठेवण्यासाठी मी पुढील आठवड्यात प्रचारात परत येण्यास सक्रिय होणार आहे.

माझ्या नजरेत अमेरिका म्हणजे लोकशाही शाबूत ठेवणारा, हक्क व स्वातंत्र्य यांचे संरक्षण करणारा आणि प्रत्येकासाठी संधी निर्माण करणारा देश आहे. रिपब्लिकनच्या परिषदेत ट्रम्प यांनी केलेल्या भाषणावरही बायडेन यांनी टीका केली. ‘‘ट्रम्प यांनी ९० मिनिटांच्या भाषणात त्यांच्या अडचणी मांडल्या. सर्वांना एकत्र आणण्याची आणि नोकरदार लोकांचे आयुष्य अधिक चांगले करण्यासाठी त्यांनी कोणतीही योजना मांडली नाही. ट्रम्प यांनी भाषणात त्‍यांच्या ‘प्रोजेक्ट २५’ या जाहीरनाम्याचा उल्लेख टाळला असला तरी त्यांच्या ‘एमएजीए’ (मेक अमेरिका ग्रेट अगेन) च्या अतिरेकी घोषणेचा अभिमानाने उल्लेख केला,’’ असे बायडेन म्हणाले. ट्रम्प हे देशाला कुठे घेऊन जाणार आहेत, हे अमेरिकन लोकांना माहीत आहे, असा टोला त्यांनी लगावला.

कृष्णवर्णीय सदस्यांचे बायडेन यांना समर्थन

अमेरिकेच्या काँग्रसमधील प्रभावशाली कृष्णवर्णीय सदस्यांच्या गटाने अध्यक्ष ज्यो बायडेन यांना समर्थन दिले आहे. या गटातील ६० सदस्यांपैकी काहींनी मात्र बायडेन यांचे वाढते वय आणि जिंकण्याची क्षमता या कारणांमुळे त्यांनी निवडणुकीत पुन्हा उभे राहू नये, असे आवाहन केले आहे. बायडेन यांना पाठिंबा देण्यावरून या गटात मतमतांतरे आहेत. त्यांच्या उमेदवारीबद्दल शंका व्यक्त होऊ लागली आहे.

सत्ताबदलवर ब्लिंकन यांचे प्रथमच वक्तव्य

अस्पेन : ‘युक्रेन लष्करीदृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याच्या मार्गावर आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र सचिव अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे. नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखालील अमेरिकेने युक्रेनचे समर्थन मागे घेतले तरी त्यांना लष्करी आणि आर्थिक मदत पुरविण्याचे आश्‍वासन २० पेक्षा जास्त देशांनी दिले आहे, असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये होणारी अध्यक्षीय निवडणूक माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जिंकू शकतील, अशी थेट शक्यता ब्लिंकन यांनी प्रथमच व्यक्त केली आहे. तसेच युक्रेनला अमेरिका करीत असलेली मदतही ते थांबवतील, असे ते म्हणाले. युक्रेनला पाठिंबा देण्याविषयीचे काँग्रेसमधील सदस्यांचे मत नव्या सरकारला लक्षात घ्यायला लागेल, असे मत ब्लिंकन यांनी शुक्रवारी (ता.१९) व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com