लंडन - काही दिवसांपूर्वीच ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचं निधन झालं आहे. या घटनेला काही महिने उलटताच आता राजघराण्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. ब्रिटिश राजघराण्याशी असलेले संबंध संपुष्टात आणणाऱ्या प्रिन्स हॅरी यांनी आपल्या आत्मचरित्रात धक्कादायक खुलासे केले आहे.
प्रिन्स हॅरी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, अमेरिकन पत्नी मेगन मार्कल हिच्यामुळे झालेल्या वादात भाऊ प्रिन्स विलियम यांनी मला फरशीवर ढकलले होते.
2019 मध्ये लंडनच्या घरी झालेल्या संघर्षाचे वर्णन करताना, हॅरीने लिहिले की, विलियमने मेगनला "हट्टी", "उद्धट" आणि "असभ्य म्हटले होते, याबाबत गार्डियनने वृत्त दिले. गार्डियनने हॅरीचे आत्मचरित्र स्पेअरची प्रत पाहिल्याचा दावा केला आहे. हॅरीने आपल्या आत्मचरित्रात पुढं म्हटलं की, जेव्हा विलियमने "माझी कॉलर पकडली, तेव्हा माझ्या गळ्यातील चैन तोटली. त्यानंतर मला जमिनीवर ढकलले, तेव्हा वाद विकोपाला गेला होता.
पुढील आठवड्यात स्पेअर हे पुस्तक जगभरात प्रकाशित होणार आहे. हॅरीच्या म्हणण्यानुसार, यामुळे त्याच्या पाठीवर दुखापतीच्या स्पष्ट खुणा होत्या. अशा अनेक विलक्षण घटनांचा उल्लेख पुस्तकात आहे. या पुस्तकामुळे ब्रिटिश राजघराण्याच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
केन्सिंग्टन पॅलेसने यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही". या पुस्तकाचे शीर्षक राजघराण्यातील आणि अभिजात वर्गातील एका जुन्या म्हणीवरून घेण्यात आले आहे. पहिल्या मुलाला पद, सत्ता आणि भाग्य यांचा वारसा मिळतो. पहिल्या मुलाला काही झाले तर, दुसरे मुलगा पदाचा मानकरी ठरतो. दुसरा मुलगा हा केवळ पर्याय अर्थात स्पेअर असतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.