WMO on Heat Wave : तापमानवाढ अन् वणव्यांसोबतच वाढत जाणार अतिवृष्टी अन् महापुराचं संकट; जागतिक हवामान संघटनेचा इशारा!

World Meteorological Organization : जुलै महिन्यात जगाच्या तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले होते.
WMO on Heat Wave
WMO on Heat WaveeSakal
Updated on

यावर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे नागरिकांचं आणि पर्यावरणाचं अतोनात नुकसान झालं आहे. हीट वेव्ह, जगभरातील जंगलांमध्ये सुरू असलेले वणवे आणि ठिकठिकाणी आलेल्या महापूर यासाठी कारणीभूत आहे, असं जागतिक हवामान विज्ञान संघटनेनं स्पष्ट केलं.

जुलै महिन्यात जगाच्या तापमानाने आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले. ऑगस्टच्या सुरुवातीला दक्षिण अमेरिकेत सहसा हिवाळा असतो. मात्र यावर्षी काही ठिकाणी उष्णतेची लाट दिसून येत आहे. फ्रान्स, इटली, ग्रीस, स्पेन, अल्जेरिया आणि ट्युनिशियासारख्या कित्येक देशांमध्ये यावर्षी दिवसाच्या आणि रात्रीच्या उच्चांकी तापमानाचा विक्रम केला. डब्ल्यूएमओच्या (WMO) प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली.

WMO on Heat Wave
Monsoon Update : मॉन्सून दाखल होऊनही राज्यात उष्णतेची लाट कायम; पेरण्या रखडल्या; धरणसाठा तळाशी, वाचा सविस्तर

दरवर्षी हजारो लोकांचा बळी

अति उष्णतेमुळे दरवर्षी हजारो लोकांचा बळी जात आहे. ही एक सगळ्यात घातक नैसर्गिक आपत्ती आहे. इतर नैसर्गक आपत्तींचा किती फटका बसला आहे हे लगेच समजतं. मात्र, हीट वेव्हचा नेमका किती परिणाम झाला आहे हे कित्येक महिने लक्षात येत नाही. त्यामुळे आपल्याला जागतिक तापमानवाढीकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे; असं मत डब्ल्यूएमओचे वरिष्ठ सल्लागार जॉन नायरन यांनी व्यक्त केलं.

वणव्यांचा मोठा फटका

यावेळी डब्ल्यूएमओने जगभरातील वणव्यांचाही उल्लेख केला. कॅनडा, ऑस्ट्रेलिया या देशांमधील मोठे वणवे आपण यावर्षीच्या सुरुवातीपासून पाहतो आहे. जुलै महिन्यात ग्रीक बेटांवरदेखील मोठे वणवे पहायला मिळाले. या वाढत्या वणव्यांचा नागरिकांसह हवामानाला देखील फटका बसतो आहे.

WMO on Heat Wave
Greece Wildfires : ग्रीसमधील वणवे थांबण्याचं नाव घेईनात; आतापर्यंत ३० हजारांहून अधिक नागरिकांचं स्थलांतर

उष्णतेमुळे वाढले महापूर

डब्ल्यूएमओचे जल विज्ञान विभागाचे संचालक स्टीफन उहलेनब्रुक यांनी वाढत्या उष्णतेबाबत चिंता व्यक्त केली. पृथ्वीवरील तापमान जसं जसं वाढत जाईल, तसं तसं आपल्याला अधिक तीव्र, गंभीर आणि सततच्या पावसाचा आणि महापुराचा फटका सहन करावा लागेल; असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.