महिलांचे अंडरगारमेंट्स बनवणाऱ्या यूएस कंपनीच्या संस्थापिकेनं आपल्या कर्मचार्यांना एक मोठं गिफ्ट दिलंय.
न्यूयॉर्क : महिलांचे अंडरगारमेंट्स बनवणाऱ्या यूएस कंपनीच्या संस्थापिकेनं आपल्या कर्मचार्यांना एक मोठं गिफ्ट दिलंय. ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती. स्पॅनक्सच्या सीईओ सारा ब्लॅकलीनं (Sara Blakely) जेव्हा ही घोषणा केली, तेव्हा कर्मचाऱ्यांचे डोळेही पाणावले. अनेक भारतीय कंपन्या दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना अनमोल भेटवस्तू देण्यासाठी ओळखल्या जातात, परंतु जगातील सर्वात तरुण महिला उद्योजक असलेल्या ब्लॅकलीनं कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या हृदयालाच स्पर्श केलाय.
अमेरिकेतील महिलांच्या अंडरगारमेंट्स कंपनीच्या (Spanx) संस्थापक आणि CEO सारा ब्लेकलीनं त्यांच्या कर्मचार्यांना एका ऑफिस पार्टीत, डेल्टा एअरलाइन्सच्या फर्स्ट क्लासची दोन तिकिटं देण्याची घोषणा केलीय. जगात कुठेही तुम्ही फिरु शकता, असंही त्यांनी सांगितलं. तसेच या सहलीसाठी त्यांना 10,000 अमेरिकन डॉलर्सही दिले आहेत. याचाच अर्थ कर्मचाऱ्यांना कंपनीच्या खर्चावर पूर्ण मौजमजा करण्याची संधी दिलीय. त्यामुळं साहजिकच रजा आधीच मंजूर झालीय.
कंपनीनं का दाखवली उदारता?
कंपनी ब्लॅकस्टोन या खासगी इक्विटी फर्मसोबत $1.2 बिलियन करार साजरा करत आहे. ब्लॅकलीनं गेल्या आठवड्यात इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात ती कर्मचाऱ्यांना सांगत होती, की हा क्षण साजरा करण्यासाठी, मी तुम्हा सर्वांसाठी जगात कुठेही प्रवास करण्यासाठी दोन प्रथम श्रेणी तिकिटे खरेदी केली आहेत. Spanx कंपनीमध्ये 500 हून अधिक कर्मचारी आहेत आणि या सर्वांना ही भेट देण्यात आलीय. एकंदरीत स्पॅनक्सने आपल्या कर्मचार्यांना खूश केलंय.
'या' कंपन्यांनी दिल्या महागड्या भेटवस्तू?
2019 मध्ये सेंट जॉन्स प्रॉपर्टीज मेरीलँड, यूएसए येथील रिअल इस्टेट कंपनीने 198 कर्मचाऱ्यांना US $10 दशलक्ष बोनस वितरित केला. म्हणजेच, एका कर्मचाऱ्याला सुमारे US $ 50,000 चा हा बोनस मिळाला. तथापि, कर्मचारी जितका मोठा, तितका हिस्सा जास्त. त्याचप्रमाणे मिशिगन कुटुंबाच्या मालकीच्या फ्लोराक्राफ्टने 2018 मध्ये ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला आपल्या 200 कर्मचाऱ्यांमध्ये 40 करोड बोनस वितरित केला होता.
भारतातील कंपन्यांकडूनही 'दिवाळी गिफ्ट'
भारतात सुरतचे हिरे व्यापारी सावजी ढोलकिया दरवर्षी दिवाळीनिमित्त आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या भेटवस्तू देण्यासाठी प्रसिद्ध आहेत. 2018 मध्ये त्यांनी 25 वर्षांची सेवा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंज SUV भेट दिली. त्याचप्रमाणे हरी कृष्णा एक्सपोर्ट्सनेही आपल्या कर्मचाऱ्यांना अशाच महागड्या भेटवस्तू दिल्या आहेत. 2016 मध्ये ढोलकिया यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून 1,260 कार आणि 400 फ्लॅट्स दिले. जवळपास दरवर्षी ते आपल्या कर्मचाऱ्यांना खूश करत आहेत. यंदा सराफ फर्निचरने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीपासून 12 दिवसांची सुट्टी जाहीर केलीय. या कंपनीत 1500 हून अधिक कर्मचारी आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.