नवी दिल्लीः एक ३७ वर्षीय महिलेच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडला आहे. जिंवत असतांनाच तिला कबर खोदून पुरण्यात आलेलं होतं. त्यानंतर तब्बल ११ दिवसांनी कबर खोदून आतल्या जिवंत महिलेला बाहेर काढण्यात आलं.
ब्राझीलमध्ये ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. एका महिलेला जिंवत असूनही पुरण्यात आलं. अनेक दिवस ती ताबूतमध्ये बेशुद्ध अवस्थेत होती. परंतु जेव्हा ती शुद्धीत यायची तेव्हा तिने बाहेर पडण्याचे खूप प्रयत्न केले. नंतर तिने ओरडायला सुरुवात केली. मग लोकांना कळलं की आतमध्ये कुणीतरी जिवंत आहे.
२०१८ मध्ये कबर खोदून महिलेला बाहेर काढलं तेव्हा याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. तेव्हापासून पोलिस या प्रकराचा तपास करत होते. आता इतक्या वर्षांनंतर या प्रकरणात धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे.
३७ वर्षीय महिलेची ओळख पटली आहे. तिचं नाव रोसांगेला अल्मेडा डॉस सैंटोस असं आहे. ब्राझीलच्या पूर्व भागातील रियाचाओ दास नेवेसमधील एका कब्रस्तानमधील ताबूत बाहेर काढलं तेव्हा त्यात रक्त सापडलं. त्यावरुन अंदाज काढला जातोय की, महिलेना बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. परंतु तिला मदत मिळाली नाहीत. याच दरम्यान तिच्या शरीराला जखमा झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.