Video: प्रेम आंधळं नाही तर 'बर्गर' असतं; महिलेने 20 वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी केलं लग्न; वाचा 'प्यार वाली' लव्ह स्टोरी!
Viral Trending Video: सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यात लव्ह स्टोरीचे देखील अनेक व्हिडिओ असतात. प्रेम आंधळ असतं असं म्हटलं जातं, पण सोशल मीडियावरील काही व्हिडिओ पाहून याची प्रचिती नक्की येते. सध्या अशीच एक लव्ह स्टोरी व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे ही स्टोरी पाकिस्तानमधील आहे.(Woman marries 20 year older than her Read Pyaar Wali story Viral)
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ खरंतर हसण्याचाच विषय आहे. या व्हिडिओमध्ये एका महिलेने आपल्या पेक्षा २० वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न केले आहे. महिलेने तिची लव्हस्टोरी देखील सांगितली आहे. तिचं म्हणणं आहे की, भूक लागल्यानंतर व्यक्तीने तिच्यासाठी शौरमा आणि जिंगर बर्गर आणला होता. त्यामुळे तिला त्या व्यक्तीवर प्रेम झाले.
महिला व्हिडिओमध्ये सांगते की, तिचा पती अनेकदा त्यांच्या घरी यायचा. नात्याने ते दूरचे भाऊ लागतात. त्यामुळे ती त्यांना भाई म्हणून बोलवायची. पण, व्यक्ती म्हणायचा की मला भाऊ नको म्हणत जाऊ. ते असं का म्हणत आहेत हे तिला समजायचं नाही. पण, कोणतीही मदत लागली किंवा इतर काही लागलं तर मला नक्की सांग असं ते सांगायचे.
एके दिवशी महिलेला भूक लागली तेव्हा तिने फोन करुन शौरमा आणण्याची विनंती केली. त्यावेळी व्यक्तीने शौरमा आणि सोबत दोन जिंगर बर्गर देखील आणलं. व्यक्तीने हे केलेलं काम पाहून महिला प्रभावित झाली आणि ती त्याच्या प्रेमात पडली.
व्हिडिओला fadi_wri8s_ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आले आहे, लोक या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात पाहत आहेत. तसेच प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण हा विषय हसण्यावारी घेत आहे. एका बर्गरने काय कमाल केली असं एका नेटकऱ्याने म्हटलं. तर, प्रेमात कोण, कुणावर, कधी आणि कसं प्रेमात पडेल याचा काही नेम नाही असं म्हटलं. (Latest Marathi News)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.