Crime News: क्रूरतेचा कळस! पतीने भावांच्या मदतीने पत्नीला झाडाला बांधले, दगडाने ठेचून केली हत्या, कारण...

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक धक्कादायक घटना समोर आली आहे
Crime News
Crime NewsEsakal
Updated on

पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. व्यभिचारी असल्याच्या संशयावरून एका महिलेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी काल (रविवारी) या घटनेची माहिती दिली आहे. लाहोरपासून ५०० किलोमीटर अंतरावर असलेल्या पंजाबमधील राजनपूर जिल्ह्यात ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने तिच्यावर व्यभिचाराचा आरोप केला होता. महिलेचे वय 20 वर्षे आहे. शुक्रवारी तिच्या पतीने आपल्या दोन भावांसह महिलेला झाडाला बांधून दगडाने ठेचून तिची हत्या केली आहे. अगोदर तिचा अमानुष छळ करण्यात आला त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या करण्यात आली आहे.

Crime News
Solar Storm : पृथ्वीला आज धडकणार सौरवादळ; ठिकठिकाणी वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता! 'आदित्य एल-1'ला किती धोका?

संबधित प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर, आरोपी भाऊ घटनास्थळावरून पळून गेले आणि पंजाब आणि बलुचिस्तानच्या सीमेवर लपून बसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ही महिला राजनपूर येथील अल्कानी जमातीची होती. पाकिस्तानमध्ये दरवर्षी खोट्या सन्मानाच्या नावाखाली अनेक महिलांची हत्या केली जात असल्याची माहिती आहे.

Crime News
North Korea : अमेरिका-दक्षिण कोरिया जवळीक उत्तर कोरियाला सहन होईना; समुद्रात केली अण्वस्त्र चाचणी

दरवर्षी अनेक हत्येची प्रकरणे येतात समोर

मानवाधिकार कार्यकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे 1000 महिलांना सन्मानाच्या नावाखाली मारले जाते. काही दिवसांपूर्वी पंजाबमधील मियांवली जिल्ह्यात सन्मानाच्या नावाखाली एका तरुण महिला डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ वर्षीय डॉक्टरला महिलेला तिच्या सहकाऱ्याशी लग्न करायचे होते. पण तिच्या वडिलांना हे मान्य नव्हते. म्हणून तिची हत्या करण्यात आली.

Crime News
Singapore President : सिंगापूरच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेले भारतीय वंशाचे थर्मन षण्मुगरत्न कोण?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()