साडे तीन मिनीटांत पास्ता न मिळाल्याने कंपनीवर ठोकला ४० कोटींचा दावा

दावा करणाऱ्या महिलेने नुकसान भरपाई मागत आरोप केला आहे की, कंपनी खोट्या जाहिराती करत आहे.
Late Food Cooking
Late Food Cookingesakal
Updated on

Women's Accusation for Late Pasta Cooking : महिलेने क्राफ्ट हेंज (Kraft Heinz) या फूड कंपनीवर ४० कोटींपेक्षा जास्त रुपयांचा दावा ठोकला आहे. महिलेने आरोप केला आहे की, जो मॅक्रोनी चीज पास्ता साडे तीन मिनीटांत शिजण्याचा दावा कंपनीने त्या पाकिटावर केला आहे. पण तेवढ्या वेळात तो पास्ता शिजत नाही. म्हणून चुकीची जाहिरात आणि फसवणुकीचा आरोप करत महिलेने खटला दाखल केला आहे.

महिलेने क्राफ्ट हेंज कंपनीवर आरोप केला आहे की, त्यांनी केलेला दावा हा फक्त मायक्रोवेव्हमध्ये ठेवण्यापर्यंतचा आहे. पण याशिवाय पास्ता बनवण्यासाठी अजून बऱ्याच स्टेप्स फॉलो कराव्या लागतात. पण कंपनीने संपूर्ण प्रक्रीयेसाठी लागणाऱ्या वेळेविषयी काहीही लिहिलेलं नाही. ही घटना अमेरिकेतली आहे.

हे ही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

कंपनीचं उत्तर

महिलेने रेडी टू कूक प्रॉडक्ट बनवणाऱ्या कंपनीवर ५ मिनियन डॉलर म्हणजे ४० कोटी ८० लाखाचा दावा केला. तिने तेथिल जिल्हा न्यायालयात ही केस दाखल केली आहे. यावर कंपनी ने उत्तर दिलं आहे की, हा मुद्दा अत्यंत क्षुल्लक असून या आरोपाचं ते कोर्टात खंडन करण्यासाठी तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.