Russia Ukraine Crisis | रशियाची मदत जर चीनने केली, तर... अमेरिकेचा इशारा

अमेरिकेने दिला चीनला इशारा
america-china
america-chinasakal
Updated on

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलीवन म्हणतात, की चीनने जर रशियाला मदत केली तर त्यास ही गंभीर परिणामांना सामना करावा लागेल. सलीवन आज चीनच्या वरिष्ठ राजनियक यांग जिएची यांच्याशी रोममध्ये भेटणार आहेत. अमेरिकेने म्हटले आहे, की रशियाला मदत केल्यास चीनला ही महागात पडू शकते. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सलीवन यांनी चीनच्या राजनयिकाशी होणाऱ्या भेटी पूर्वीच इशारा दिला आहे. जर निर्बंधांमधून वाचवण्यासाठी रशियाची मदत जर चीनने (China) केली, तर त्याचे परिणाम भोगण्यास तयार राहावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी यांग जिएची यांच्याशी भेटून त्यांना अमेरिकेची चिंता सांगितली जाणार आहे. अमेरिकेचे (America) म्हणणे आहे, की रशियाने (Russia) चीनकडून लष्करी यंत्रसामग्री मागितली आहे. (Won't Let Any Country Help To Russia, Says America)

america-china
'हिजाब गर्ल'च्या सत्कार कार्यक्रमास नाकारली परवानगी,वंचितची कोर्टात धाव

या बाबत 'फायनान्शियल टाईम्स'मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र चीनने त्याचे खंडन केले आहे. वाॅशिंग्टनमधील चीनच्या दुतावासाचे प्रवक्ते लियू पेंगयू म्हणाले, मी तर असे काही ऐकले नाही. लियू म्हणाले, की युक्रेनमधील सद्यःस्थितीवर चीन दुःखी आहे. ते म्हणाले, आम्ही या संकटावरील शांततापूर्ण उपायांसाठी सर्व प्रयत्नांना पाठिंबा आणि त्यास प्रोत्साहन देत आहोत. संकटाच्या काळा व्यतिरिक्त रशिया आणि युक्रेन यांच्यामधील शांततापूर्ण उपायांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वकाही मदत करायला हवे.

america-china
रशियाने मागितली भारताकडे मदत, गुंतवणूक वाढवण्याची केली विनंती

जेक सलीवन 'सीएनएन' वृत्तवाहिनीशी रविवारी बोलताना म्हणाले, रशियाचे युक्रेनवरील हल्ल्यांची योजना चीनला अगोदरच माहीत होती. त्यांना भले त्या योजनेतील तपशील माहीत नसेल. चीन कितपत रशियाला मदत करत आहे. यावर आम्ही नजर ठेवून आहोत. कोणत्याही देशाला रशियास निर्बंधांपासून वाचवण्यासाठी मदत करु दिले जाणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()