माझे नाव रिया फ्रान्सिस. मी गेल्या ५ वर्षापासून जर्मनीतील Land Here सोबत काम करत आहे. मी इथल्या Bosch Rexroth AG कंपनीत SAP Consultant म्हणून काम करत आहे. माझ्या सोबत असलेल्या प्रत्येकाचे स्वप्न होत की, जर्मनीत काम करावे. तिकडे सेटल व्हावे. हे प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होत नाही. मात्र, माझे हे स्वप्न पूर्ण झाले.
रिया एक तरूणी असण्यासोबतच एक आई सुद्धा आहे. परदेशात राहून घर आणि नोकरी तसेच मुलांची जबाबदारी पार पाडणं किती अवघड असेल याची कल्पना तुम्हाला आली असेल.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रिया पाच वर्षांपूर्वी बाडेन-वुर्टेमबर्ग येथे गेली आणि आता ती SAP साठी सल्लागार म्हणून काम करते. स्थलांतरित झाल्यापासून, ती तिच्या कारकिर्दीत नवीन मातृत्व यशस्वीपणे मिसळू शकली आहे. कामावर पूर्ण लक्ष देऊन ती घर अन् मुलंही सांभाळतेय. हे ती शक्य करू शकतेय ते फक्त या ठिकाणी राहून.
रिया आणि तिचे पती अलीकडेच त्यांच्या स्वतःच्या घरात राहायला गेले आहेत. तिला चित्रकलेसह तिच्या वैयक्तिक आवडींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी जागा दिली. रियासाठी Baden-Württemberg ने भरभराटीचे करिअर आणि वैयक्तिक जीवन या दोन्हींचा आनंद घेणे शक्य केले आहे. ज्यामुळे काम आणि जीवनाचा समतोल साधला गेला आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
इथल्या वर्क कल्चर बद्दल रिया सांगते की, माझा जर्मनीत येण्याचा निर्णय योग्य होता हे सिद्ध झालं आहे. कारण, इथंल्या कंपनी तुम्हाला फक्त काम करा असं सांगत नाहीत. तर,तुमच्या स्कील्सही कशा डेव्हलप होतील. अन् त्यांचा कसा फायदा होईल याचा विचार करतात. इथले लोकही सामावून घेणारे आहेत. त्यामुळे वेगळ्या देशात येऊनही कधी अडचण वाटली नाही.
माझे बाळ दहा महिन्याचे होते तेव्हा मला ऑफिस जॉईन करावे लागले. तेव्हा मी थोडी चिंताग्रस्त होते. कारण, बाळाला सोडून कामावर रूजू होणं मला अवघड वाटत होतं. पण, ते शक्य झालं इथे असलेल्या कुटुंब प्रणालीमुळे. मला माझ्या बाळालाही वेळ देता येत होता अन् कामही करता येत होतं.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
Baden-Württemberg हे फक्त काम करण्याचे ठिकाण नाही. ते राहण्यासाठीचे योग्य मापक असलेले ठिकाण आहे. विशेषत: जे लोक काम करत असताना त्यांच्या कुटुंबाची जास्त आठवण काढतात. त्यांच्यासाठी हे ठिकाण योग्यच आहे, असे रिया म्हणाली.
स्वत:च्या आवडीनिवडी जपता येतील त्याबद्दल रिया सांगते की, कुठलंही क्षेत्र असो, काम करत असलेल्या ठिकाणाला नकोशी वाटणार जागा वाटते. कारण, या ठिकाणी काम करणं तसं सोप्प नसतं. मन मारून रहावं लागतं.
दिवसरात्र कंपनीच्या भल्याचा विचार करावा लागतो. पण, इथं असं नाही. या कामासोबतच मला स्वत:च्या आवडी निवड जपता आल्या. मला चित्रकलेची आवड आहे, मी तो छंद जोपासला आहे.
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.