Pakistan Crisis: पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, आता जागतिक बँकेने दिला मोठा धक्का

पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
Pakistan Crisis
Pakistan CrisisSakal
Updated on

Pakistan Crisis: पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. महागाईने सर्व विक्रम मोडीत काढत 48 वर्षांच्या उच्चांकी पातळी गाठली असून त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.

परकीय चलनाच्या घटत्या गंगाजळीमुळे पाकिस्तानला आवश्यक असलेल्या सर्व वस्तू आयात करणे शक्य होत नाही. त्यामुळे लोकांना मैदा, तांदूळ यासारख्या दैनंदिन वस्तू मिळू शकत नाहीत.

मिळत असल्या तरी त्यांना सामान्यपेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसे मोजावे लागतात. दरम्यान, जागतिक बँकेने पाकिस्तानला दणका दिला आहे.

जागतिक बँकेने पाकिस्तानच्या विकास दरात कपात केली आहे. जागतिक बँकेने पाकिस्तानचा विकास दर 2 टक्क्यांवरून 0.4 टक्क्यांवर आणला आहे.

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, जागतिक बँकेने म्हटले आहे की, विविध आर्थिक धक्क्यांमुळे या आर्थिक वर्षात सुमारे 4 दशलक्ष पाकिस्तानी गरिबीत गेले आहेत.

'सार्वजनिक कर्ज संकट' टाळण्यासाठी जागतिक बँकेने पाकिस्तानला ताबडतोब नवीन विदेशी कर्जाची व्यवस्था करण्याचा सल्ला दिला आहे.

पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि जागतिक बँकेच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी वॉशिंग्टनला जाणार होते. मात्र त्यांनी आपला दौरा रद्द केला आहे.

या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला आयएमएफच्या बेलआउट पॅकेजची नितांत गरज आहे, मात्र पाकिस्तानला अद्याप हे पॅकेज मिळालेले नाही. पाकिस्तान सरकार 1.1 अब्ज डॉलरचे बेलआउट पॅकेज मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.

यासाठी त्यांनी आयएमएफच्या सर्व अटीही मागितल्या आहेत. मात्र त्याला अद्याप निधी मिळालेला नाही. पाकिस्तानचे अर्थमंत्री इशाक दार 10 एप्रिल रोजी होणाऱ्या IMF बैठकीत सहभागी होणार होते. वृत्तानुसार, देशांतर्गत राजकीय गोंधळामुळे त्यांनी वॉशिंग्टनचा दौरा रद्द केला आहे.

Pakistan Crisis
Adani Total Gas: अदानी टोटल गॅसने CNG-PNG च्या दरात केली मोठी कपात, मध्यरात्री 12 पासून नवीन दर लागू

पाकिस्तान कर्जाच्या ओझ्याखाली :

पाकिस्तानवरील एकूण कर्ज आणि दायित्व 60 ट्रिलियन पाकिस्तानी रुपयांपेक्षा जास्त आहे. हे देशाच्या जीडीपीच्या 89 टक्के आहे. यापैकी सुमारे 35 टक्के कर्ज हे केवळ चीनचे आहे.

त्यात चीनच्या सरकारी बँकांच्या कर्जाचाही समावेश आहे. पाकिस्तानवर चीनचे 30 अब्ज डॉलर कर्ज आहे, जे फेब्रुवारी 2022 मध्ये 25.1 अब्ज डॉलर होते.

Pakistan Crisis
सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.