नवी दिल्ली : जगभरात २०१९ पासून कोरोनाचा फैलाव झाला आहे. तेव्हापासून आतापर्यंत झालेल्या मृतांची सरकारद्वारे जाहीर होणारी आकडेवारीपेक्षा प्रत्यक्षातील संख्या दोन ते चारपटीने जास्त आहे, असा दावा ब्रिटनमधील विज्ञानविषयक नेचर या प्रतिष्ठित नियतकालिकात एका संशोधनाच्या आधारे केला आहे.(Corona Death Update News)
सरकारी आकड्यांनुसार कोरोनाच्या जागतिक साथीला सुरुवात झाल्यापासून ५५ लाख पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला आहे. ‘नेचर’मध्ये प्रकाशित एका नव्या संशोधनानुसार मृतांची खरी संख्या त्यापेक्षा कितीतरी अधिक होऊ शकेल. जागतिक पातळीवर देशाची बदनामी व प्रतिमा खराब होऊ नये म्हणून अनेक सरकारे त्यांच्या देशातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर लपवित आहेत. ‘लंडनमधील ‘द इकॉनॉमिस्ट’ मासिकाद्वारे मृतांच्या मोजमापासाठी जी प्रणाली वापरली जाते, त्याच्याच साह्याने ‘नेचर’मधील प्रसिद्ध झालेल्या या संदर्भातील अहवाल तयार केला आहे. एका यंत्राच्या आधारे निश्चित केलेली आकडेवारी त्याच्या केंद्रस्थानी आहे.
कोरोनाबाधितांची माहिती देण्याच्या पद्धतींची या संशोधनात नोंद घेतली आहे. उदाहरणार्थ नेदरलँडमध्ये साथीच्या प्रारंभीच्या काळात जे कोरोनासंक्रमित रुग्णालयात भरती झाले आहेत आणि तेथे त्यांचा मृत्यू झाला तरच त्यांना कोरोनामृत मानले गेले होते. त्याचवेळी बेल्जियममध्ये हिवाळ्यामुळे मरण पावलेल्या लोकांचाही चाचणीविना कोरोनामृतांमध्ये समावेश केला होता. ‘नेचर’मध्ये प्रकाशित अहवालानुसार जागतिक आरोग्य संघटनेचा कोरोनामृतांची पहिली माहिती लवकरच जाहीर होणार आहे. कोरोनामुळे झालेल्या मृतांची खरी संख्या जाणून घेण्यासाठी संघटनेने अनेक तज्ज्ञांना सल्ला घेतला आहे. त्या आकडेवारीची पाच वर्षांपूर्वीच्या मृतांच्या संख्येशी तुलना करण्यात येणार आहे.
गरीब देशांमध्ये वीस पट जास्त
श्रीमंत देशांमध्ये कोरोनामृतांची वास्तव संख्या त्यांच्या सध्याच्या आकड्यांपेक्षा एक तृतीयांश जास्त असू शकते, दुसरीकडे गरीब देशांमध्ये तो २० पटीनेही जास्त असू शकते, असे अहवालात म्हटले आहे. १९१८-२० दरम्यान जगात स्पॅनिश फ्लूची साथ आली होती, त्यापेक्षा कोरोनाची साथ महाभयंकर असल्याचा दावा यात केला आहे.
शंभर देशांचा खुलासा नाही
भारत व चीनसह १०० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनामृतांच्या अधिक संख्या उघड केलेली नाही. या देशांमधील सरकार मृतांची गणना करीत नाही किंवा ती तातडीने जाहीर करीत नाही, असे अहवालात म्हटले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.