कोरोनाविरोधात सरसकट निर्बंध नकोच : रोडरिको ऑफ्रिन

जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रतिनिधी रोडरिको ऑफ्रिन यांचे मत
corona
corona sakal
Updated on

कोलकता : ‘‘कोरोनाच्या संसर्गाला नियंत्रित ठेवण्यासाठी (Control On Corona) भारतासारख्या देशाने जोखिमेवर आधारित दृष्टिकोनाचा अंगीकार करणे गरजेचे असून लोकांच्या हालचाली आणि प्रवासावर सरसकट निर्बंध घालण्यासारखे उपाय अघोरी ठरू शकतात.’’ अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेचे (WHO) भारतातील प्रतिनिधी रोडरिको एच ऑफ्रिन यांनी व्यक्त केली आहे. जोखिमेवर आधारित रणनीती हाच भारतासाठी सर्वोत्तम उपाय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. (Corona And India)

भारतामध्ये लोकांचे प्राण वाचविण्याबरोबरच त्यांच्या रोजीरोटीचे संरक्षण करणे देखील गरजेचे आहे. नवा व्हेरिएंट नेमका किती संसर्गजन्य आहे? त्याच्यामुळे नेमके किती नुकसान होऊ शकते? कोरोना प्रतिबंधक लशी लोकांचे कितपत संरक्षण करू शकतात? सामान्य माणसांना या संसर्गाचा धोका नेमका किती आहे? आणि त्यासाठी कोणत्या उपायांचा अवलंब केला पाहिजे? या सगळ्या बाबी खूप महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

corona
पुण्यातील पाच स्टार्टअपला राष्ट्रीय स्टार्टअप पुरस्कार

''जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) कोठेही लोकांच्या प्रवासावर निर्बंध घालावेत असे म्हटलेले नाही. कोणत्याही प्रकारचे व्यवहार अशापद्धतीने सरसकटपणे बंद करणे हे आपल्यावरच उलटू शकते. भारताची वैविध्यपूर्ण भौगोलिक रचना लक्षात घेता फार हुशारीने नियोजन आखावे लागणार आहे.''

-रोडरिक एच ऑफ्रिन, भारतातील प्रतिनिधी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.