कोरोनावर चीनी लस जगभरात वापरता येणार; WHO कडून मंजुरी

येत्या काही आठवड्यात ही लस इतर देशांना उपलब्ध होईल. युनिसेफ (UNICEF) आणि अमेरिकेतील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयातून ही लस वितरीत केली जाऊ शकते.
Vaccination
VaccinationRepresentative
Updated on
Summary

येत्या काही आठवड्यात ही लस इतर देशांना उपलब्ध होईल. युनिसेफ (UNICEF) आणि अमेरिकेतील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयातून ही लस वितरीत केली जाऊ शकते.

न्यूयॉर्क - जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) चीनची (China) औषध निर्मिती कंपनी असलेल्या सिनोफार्मच्या (Sinopharm) लशीचा आपत्कालीन वापर करण्यास मंजुरी दिली. शुक्रवारी या व्हॅक्सिनला WHO ने मंजुरी दिल्यानंतर आता ही लस गरजु देशांपर्यंत संयुक्त राष्ट्राच्या (United Nations) कोव्हॅक्स प्रोग्रॅम (Covax) अंतर्गत पोहोचवण्यात येईल. कोट्यवधी डोस जगभरात पोहोचवता येणार आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुपच्या निर्णयानंतर चीनी कंपनीच्या सिनोफार्म लशीला संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स अंतर्गत इतर देशांना पुरवलं जाईल. येत्या काही आठवड्यात ही लस इतर देशांना उपलब्ध होईल. युनिसेफ (UNICEF) आणि अमेरिकेतील जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयातून ही लस वितरीत केली जाऊ शकते.

याआधी जागतिक आरोग्य संघटनेनं शुक्रवारी एक प्रमुख समिती स्थापन केली. या समितीकडून चीनच्या कोरोना प्रतिबंधक लशीला आपत्कालीन परिस्थितीत वापराला मंजुरी द्यायची की नाही हे ठरवण्यात आले. याबाबतची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. यामुळे आता संयुक्त राष्ट्राकडून सुरु करण्यात आलेल्या कोव्हॅक्स अंतर्गत लाखो डोस गरजू देशांपर्यंत पोहोचवता येतील. सिनोफार्म आता येत्या काही महिन्यात संयुक्त राष्ट्राच्या कोव्हॅक्स अंतर्गत जगभरातील गरीब देशांना दिली जाईल.

Vaccination
जर्मनीचं कोरोनाविरोधी लढाईचं सूत्र; 'सेव्हन डे इन्सिडन्स'

अमेरिकेतील संयुक्त राष्ट्राच्या प्रादेशिक कार्यालये आणि मुलांसाठी संयुक्त राष्ट्राची एजन्सी युनिसेफच्या माध्यमातून याचे वितरण केलं जाऊ शकेल. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ते ख्रिस्तियन लिंडमिअर यांनी सांगितलं की, याबाबतचा निर्णय पुढच्या शुक्रवारपर्यंत होण्याची आशा आहे. लस किती प्रभावी आहे याशिवाय सिनोफार्मने त्यांच्या दोन डोसबाबत खूप कमी माहिती दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()