वाढत्या कोरोनामुळे जागतिक आरोग्य संघटनेनं दिला सतर्कतेचा इशारा

चीनमध्ये लाॅकडाऊन, तर दक्षिण कोरिया, जर्मनीसह इतर देशांमध्ये वाढू लागला कोरोना.
WHO
WHOTeam eSakal
Updated on

जीनिव्हा : जगात वाढत्या कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येमुळे जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization) चिंता व्यक्त केली आहे. संघटनेने जगाला विषाणू विरुद्ध सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. या बरोबरच ही मोठ्या संकटाची सुरुवात असू शकते, अशी शक्यता वर्तवली आहे. दक्षिण कोरिया आणि चीनसह (China) काही देशांमध्ये संक्रमणाच्या आकड्यांमध्ये वाढ सुरु आहे. या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की अमेरिकेसह अनेक देशांमधील स्थिती बिघडू शकते. (World Health Organization Express Concerns For Corona Virus New Cases)

WHO
अखेर चीन उतरला रशियाच्या मदतीला, अमेरिकेने केलाय विरोध

कारण सांगितले, चिंता व्यक्त केली

जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले, की महिनाभर आकडे कमी झाल्यानंतर गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढू लागले आहेत. ओमिक्राॅन (Omicron) व्हेरिएंट, बीए.२ सब व्हेरिएंट आणि कोरोना (Corona) निर्बंधांकडे दुर्लक्ष आदी कारणांमुळे कोरोना वाढतोय. संघटनेचे अध्यक्ष ट्रेडरोस अधानोम घेब्रेयसिस म्हणाले, काही देशांमध्ये कोरोना चाचण्या कमी होत असल्याने ही ते वाढत आहे. याचा अर्थ असा की रुग्णसंख्या वाढत आहे. ही फक्त सुरुवात आहे. डब्ल्यूएचओचे अधिकारी काही देशांमध्ये चुकीच्या माहितीमुळे कमी झालेले कोरोना लसीकरण हे कोरोना वाढीचे एक कारण मानत आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना संघटनेचे मारिया वेन केरखोव्ह म्हणाले, की BA.2 आतापर्यंत सर्वात वेगाने फैलावणारा व्हेरिएंट दिसत आहे. मात्र अद्यापही याबाबत स्पष्ट झालेले नाही. सध्या नवीन व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढत असल्याचे सिद्ध झालेले नाही.

WHO
Germany : जर्मनीत पुन्हा मोठ्या संख्येने वाढू लागले कोरोनाचे रुग्ण

अशा पद्धतीने परिस्थिती बिघडत चालली

गेल्या आठवड्याच्या तुलनेत जगभरात नवीन संक्रमणाची संख्या ८ टक्क्यांपर्यंत वाढली. ७ ते १३ मार्चच्या दरम्यान १.१ कोटी नवीन रुग्ण आणि ४३ हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाल्या. जानेवारीनंतर पहिल्यांदा ही वाढ दिसली होती. या दरम्यान डब्ल्यूएचओचे पश्चिम प्रशांत क्षेत्रात संक्रमणाचे आकडा सर्वात जास्त वाढले. यात दक्षिण कोरिया आणि चीनचा समावेश आहे. येथे रुग्णसंख्या २५ टक्के आणि मृत्यू २७ टक्क्यांपर्यंत वाढली. आफ्रिकेतही नवीन रुग्णसंख्येत १२ टक्क्यांनी वाढ झाली आणि मृत्यू १४ टक्क्यांनी वाढली.

WHO
रशियाचा मोठा हल्ला, 'ब्रेड'साठी रांगेत उभ्या असलेल्या १० जणांचा मृत्यू

युरोपमध्ये नवीन केसेस २ टक्क्यांनी वाढलीत. मात्र मृत्यूदरात वाढ नाही. मार्चच्या सुरुवातीपासून ऑस्ट्रिया, जर्मनी, स्वित्झर्लंड, नेदरलँड आणि ब्रिटनमध्ये रुग्णसंख्या वाढत आहे. अनेक तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली, की युरोप कोरोना विषाणूच्या आणखीन एका लाटेचा सामना करित आहे. मात्र पूर्ण युरोपातील स्थिती चिंताजनक नाही. जसे की डेन्मार्कमध्ये फेब्रुवारीत BA.2 ची रुग्णसंख्या वाढली. पण नंतर ती कमी झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.