World Mosquito Day : डासांबाबत या गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात, का साजरा केला जातो जागतिक डास दिवस?

डास विविध प्रकारचे असून विविध आजार पसरवतात.
World Mosquito Day
World Mosquito Dayesakal
Updated on

World Mosquito Day : जागतिक डास दिन हा एक विशेष दिवस आहे जो डास आणि त्यांच्यापासून होणाऱ्या आजारांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी समर्पित आहे. जगभरात दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी हा दिवस जागतिक डास दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य संघटना गेल्या १२६ वर्षांपासून डासांचे निरीक्षण करताय.

डास हे आकाराने जरी लहान असले तरी शतकानुशतके त्यांच्या पिढीत वाढ करणारे ते एकमेव भक्षक आहेत, शिवाय डास सर्वात प्राणघातक कीटकांपैकी एक मानले जातात. हा लहानसा प्राणी खूप मोठ्या आजारास कारणीभूत ठरू शकतो. डास विविध प्रकारचे असून विविध आजार पसरवतात. त्यांच्याबाबत या काही गोष्टी आपल्या प्रत्येकालाच माहिती असायला हव्यात. चला तर जाणून घेऊया सविस्तर.

इतिहास:

1897 मध्ये सर रोनाल्ड रॉस यांनी डासांचा मलेरियाशी संबंध जोडलेल्या शोधाचा सन्मान करण्यासाठी जागतिक डास दिनाची स्थापना करण्यात आली. मलेरिया,डेंग्यू, ताप आणि झिका विषाणू यांसारख्या रोगांबद्दल जागरुकता वाढवण्याचा हा दिवस आहे. धोका समजून घेऊन आणि प्रतिबंधात्मक उपाय करून, आपण या त्रासदायक कीटकांपासून स्वतःचे आणि आपल्या समुदायाचे रक्षण करू शकतो. त्यामुळे हा दिवस महत्वाचा आहे.

World Mosquito Day
Soap Attracts Mosquito : खरं की काय! डास केवळ माणसांचीच नाहीतर साबणाचीही पप्पी घेतात? संशोधकांनीच शोध लावलाय!

महत्त्व:

जागतिक डास दिवस महत्त्वाचा आहे कारण तो सार्वजनिक आरोग्यावर डासांच्या प्रभावाबद्दल जागरूकता वाढवतो. या डासापासून आपल्याला मलेरिया, डेंग्यू ताप आणि झिका विषाणू यांसारख्या रोगांची लागण होते.

World Mosquito Day
Mosquito Disease : साठलेल्या पाण्यामुळे डासांचा उच्छाद वाढला; साथीच्या आजारांना निमंत्रण

डासांपासून स्वत:चा बचाव कसा कराल?

डासांमुळे पसरणारे रोग टाळण्यासाठी, प्रतिबंधात्मक उपाय करणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या काही टिप्स आहेत

1. डासांपासून बचाव करण्यासाठी डास पळवणारी क्रीम त्वचेवर लावा.

2. संरक्षणात्मक कपडे घाला : डास चावणे कमी करण्यासाठी तुम्ही लांब बाहीचे टॉप, पँट आणि मोजे यांनी शरीर झाकून घेऊ शकता. (Mosquito)

3. साचलेले पाणी काढून टाका : साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते, त्यामुळे बादल्या, फ्लॉवर पॉट्स किंवा कोणत्याही कंटेनरमध्ये साचलेले पाणी रिकामे करा.

4. बेड नेट वापरा : झोपताना, डास चावण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मॉक्स्क्यूटो नेट वापरा, विशेषत: मलेरियाचा प्रादुर्भाव असलेल्या भागात ही नेट आवर्जून वापरावी.

5. पहाटे आणि संध्याकाळच्या वेळी डास सर्वात जास्त सक्रिय असतात, त्यामुळे या काळात घरातच राहण्याचा प्रयत्न करा.

लक्षात ठेवा, डासांपासून होणा-या रोगांचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधच महत्वाचा ठरतो. सतर्क राहा आणि स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे डासांपासून संरक्षण करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.