World Oceans Day : समुद्र वाचवा; नाहीतर...

जगाच्या इतिहासात ८ जूनला विशेष महत्त्व आहे.
Arabian-Sea
Arabian-Sea
Updated on

प्रत्येक दिवसाच एक खास महत्त्व असतं. त्यामुळेच आज जागतिक पातळीवर अनेक महत्त्वाचे दिवस साजरे केले जातात. यामध्येच निसर्गाशी निगडीत आज जागतिक महासागर दिन सेलिब्रेट केला जात आहे. त्यामुळे जगाच्या इतिहासात ८ जूनला विशेष महत्त्व आहे. संयुक्त राष्ट्रांनी ८ जून हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून अधिकृतरित्या साजरा करण्यास सुरुवात केली आणि ही परंपरा आजतागायत सुरु आहे. परंतु, याच दिवशी हा दिवस का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय ते थोडक्यात आपण जाणून घेऊयात. (world-ocean-day-2021-history-significance-and-theme)

वाढत्या जागतिकीकरणासोबतच प्रदुषणाचं प्रमाणही वाढ आहे. केवळ जमिनीवरच नव्हे तर आता नदी, कालवे, समुद्र यांमधील प्रदुषणाचं प्रमाणही वाढतांना दिसत आहे. त्यामुळे समुद्रातील प्रदुषणाविषयी जनजागृती करण्यात यावी या संदर्भात १९९२ मध्ये कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिखर परिषदेत एक प्रस्ताव सादर केला. या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्र संघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून ‘द ओशन प्रोजेक्ट’ या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने जागतिक महासागर दिन आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे.

Arabian-Sea
Corona After Effects: ब्लॅक फंगसनंतर रुग्णांमध्ये गँगरीनची समस्या

आपल्या जीवनात पाण्याचं किती महत्त्व आहे हे कोणालाही वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच हे महासागर संरक्षिले जावेत त्यांची नैसर्गिकदृष्ट्या काळजी घेतली जावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

Arabian-Sea
Swiggy लाही ग्राहकांची काळजी; विचारला भन्नाट प्रश्न

दरम्यान, जागतिक महासागर दिनानिमित्त संयुक्त राष्ट्रांचे सर्व सदस्य देश, त्यांतील सागरी परिसंस्थेशी संबंधित संस्था, अनेक स्वयंसेवी संस्था, संशोधक-अभ्यासक एकत्र येऊन समुद्राविषयीचे विविध पैलू जगासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसंच समुद्रांची योग्य काळजी घेतली नाही तर समुद्रीजीवदेखील नष्ट होऊ शकतात. म्हणूनच, तब्बल दहा लाख प्रजातींना नष्ट होण्यापासून वाचवायचं असेल तर आपल्याला समुद्राची काळजी घेणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.