तनाकांच्या मृत्यूनंतर, 118 वर्षीय सिस्टर लुसिली रँडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनली. त्यांना सिस्टर आंद्रे या नावानंही ओळखलं जात होतं.
जगातील सर्वात वृद्ध महिला फ्रेंच नन लुसिली रँडन (French Nun Lucile Randon) यांचं मंगळवारी निधन झालं. त्या 118 वर्षांच्या होत्या. त्यांनी फ्रान्सच्या टुलॉन शहरात अखेरचा श्वास घेतला.
रँडन यांचे प्रवक्ते डेव्हिड टवेला (David Twela) यांनी सांगितलं की, मंगळवारी पहाटे 2 वाजता त्यांचं निधन झालं. 'रँडनची एकच इच्छा होती की, आपल्या प्रिय भावाला भेटावं.' टुलॉनचे महापौर हबर्ट फाल्को (Hubert Falco) यांनी ट्विटरवर त्यांच्या मृत्यूची पुष्टी केलीये. त्यांनी लिहिलंय, 'रात्री जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचं निधन झालं. आम्हाला खूप दु:ख आणि वेदना होत आहेत.'
गेल्या वर्षी जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती जपानच्या केन तनाका यांचं निधन झालं. त्या 119 वर्षांच्या होत्या. तनाकांच्या मृत्यूनंतर, 118 वर्षीय सिस्टर लुसिली रँडन जगातील सर्वात वृद्ध व्यक्ती बनली. त्यांना सिस्टर आंद्रे या नावानंही ओळखलं जात होतं. त्यांचा जन्म 1904 मध्ये फ्रेंच शहरात अल्सेस इथं झाला. रँडन 19 वर्षांची असताना कॅथलिक बनली. आठ वर्षांनंतर ती नन बनली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.