World Snake Day: हा दिवस का साजरा केला जातो ?

जाणून घ्या सापांविषयी या 7 रंजक गोष्टी..
World Snake Day: हा दिवस का साजरा केला जातो ?
Updated on

जगभरात दरवर्षी 16 जुलै रोजी जागतिक सर्प दिन (World Snake Day) साजरा केला जातो. या दिवसाचे मुख्य उद्देश हाच आहे की, लोकांच्या मनातील सापांविषयीचे गैरसमज दूर करून जगभरातील लोकांमध्ये सापाविषयी जनजागृती करणे. तसेच आपल्या पृथ्वीवर सापांची भूमिका किती महत्त्वाची आहे हेही लोकांना पटवून सांगणे. साप ही एक अशी प्रजाती आहे जिच्याबद्दल जगभरातील अनेक देशांमध्ये गैरसमज पसरले आहेत आणि त्याबद्दल अनेक समजुती देखील आहेत. भारतात नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. साप हा प्राणी जितका दिसायला आकर्षक आहे तितकाच तो अनेक लोकांसाठी भयावह आहे. अलीकडच्या काळात आधुनिकीकरणाच्या नावाखाली झपाट्याने जंगलतोड होत आहे. त्यामुळे सापांच्या अनेक प्रजातीही धोक्यात आल्या आहेत.

आज आम्ही तुम्हाला World Snake Day चे औचित्य साधून सापांशी संबंधित काही रंजक गोष्टी सांगणार आहोत.

World Snake Day: हा दिवस का साजरा केला जातो ?
नागांचं गाव माहितीय? इथं गावातल्या प्रत्येक चिमुरड्याच्या गळ्यात दिसतो 'साप'

1. पृथ्वीवर सापांच्या 3500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यापैकी फक्त 600 प्रजाती विषारी आहेत. मात्र आपण प्रत्येक सापाला आपण विषारी समजतो. त्यामुळे साप दिसला की लोक लगेच घाबरून जातात.

2. किंग कोब्रा हा जगातील सर्वांत मोठा साप आहे. हा साप आपली अंडी घालण्यासाठी घरटे तयार करणारा जगातील एकमेव साप आहे.

3. जगात उडणारे देखील सापही आहेत. ते काही पक्षी किंवा वटवाघुळंसारखे उडत नाहीत परंतु उंच झाडांवरून खाली उडी मारू शकतात. अनेक वेळा असे साप झाडाच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उडूनच पोहोचतात.

4. सापांना कान नसतात. त्यामुळे ते कसे ऐकतील, असा प्रश्न पडतो. खरं तर, अशा सापांच्या खालच्या जबड्याजवळ हाडे असतात ज्यात पाण्याच्या किंवा पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळील आवाजाचे जाळे ओळखण्याची क्षमता असते.

5. काही साप तर चक्क अंड्यांऐवजी पिलांना जन्म देतात. रसेल वाइपर हा एक असाच प्रकारचा साप आहे.

6. सापाची दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता खूपच कमी असते. त्यांच्याकडे गंधाची आश्चर्यकारक क्षमता असते. सापांना त्यांच्या जिभेने वास घेतो येतो. यामुळेच साप अनेकदा जीभ आत बाहेर काढत असतात.

7. साप अनेकदा कीटक, उंदीर आणि बेडूक खातात. ते त्यांची शिकार पूर्ण गिळतात कारण त्यांचा खालचा जबडा वरच्या जबड्यापेक्षा वेगळा असतो.आणि नंतर मग रवंथ करुन ते खातात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.