Dalai Lama: जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल; दलाई लामा यांचा मोठा दावा, कारणही सांगितलं

दलाई लामा यांनी काल (शनिवार) कालचक्र मैदानावर प्रवचन करताना या गोष्टी सांगितल्या आणि मानवजातीला त्याच्या धोक्यांची जाणीव करून दिली.
Dalai Lama
Dalai Lamaesakal
Updated on

Dalai Lama: तिबेटचे आध्यात्मिक नेते दलाई लामा यांनी मोठा दावा केला आहे. जगाची तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल सुरु असल्याचे दलाई लामा म्हणाले. त्यांनी याचे कारणही सांगितले आहे. ही चिंतेची बाब असल्याचे लामा यांनी म्हटले आहे. दलाई लामा यांनी काल (शनिवार) कालचक्र मैदानावर प्रवचन करताना या गोष्टी सांगितल्या आणि मानवजातीला त्याच्या धोक्यांची जाणीव करून दिली.

आधीच जगाला अहंकार, राग आणि मत्सरामुळे दोन महायुद्धांचा सामना करावा लागला आणि आता तिसऱ्या महायुद्धकडे वाटचाल सुरु आहे. ही चिंतनाची बाब आहे. विध्वंसक शक्तींमधून स्वार्थी प्रवृत्ती निर्माण होतात. याच्या प्रभावाखाली आपण युद्ध आणि संघर्षात अडकतो. एकमेकांना मारतो आणि इजा करतो, असे दलाई लामा म्हणाले.

ज्ञानाची भूमी बोधगया येथे दलाई लामा बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन करत असतात. विविध देशांमधील ६० हजरांहून अधिक बौद्ध भाविक या कार्यक्रमात येत असतात. दलाई लामा यांनी अनुयायांना बोधिसत्वांचे महत्त्व आणि स्वार्थी मनामुळे होणारे नुकसान समजावून सांगितले.  तुमच्यामध्ये शांतता असेल तरच तुम्ही तुमच्या सभोवताली शांतता निर्माण करू शकाल, असे त्यांनी सांगितले.

हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणार्‍या अहंकारी वर्तनाचा त्यांनी निषेध केला. तसेच मानवांच्या एकतेच्या संकल्पनेसाठी सर्व समान असणे आवश्यक असल्याचे दलाई लामा म्हणाले.

Dalai Lama
Anil Deshmukh: अजित पवार परत येणार नाहीत! अनिल देशमुखांचा दावा ;म्हणाले,'अनेकांच्या ‘फाईल' तयार'

जीवनाचा उद्देश समजून घेणे आणि ते योग्यरित्या जगणे सर्वात महत्वाचे आहे. करुणेशिवाय मानवी अस्तित्व शक्य नाही. सुख बाहेरून कुठूनही येत नाही. ते तुमच्या स्वतःच्या कृतीतून निर्माण होते. प्रत्येक दुःखाचे कारण अज्ञान आहे. सुखाच्या शोधात आपण इतरांना दुःख देतो. जे लोक आपल्या कर्माकडे आणि कृतीकडे लक्ष देतात आणि आपल्या कर्माने किंवा कृतीने इतर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न करतात तेच सुखी आणि शांती प्राप्त करतात.मनात दुःख असेल तर ते नष्ट केल्याशिवाय शांती मिळू शकत नाही.जेव्हा तुम्ही दुःख ओळखता तेव्हाच ते नष्ट होईल.आळस, निष्काळजीपणा इत्यादींमुळे मनाला त्रास होतो, असे दलाई लामा म्हणाले.

पुण्य कर्म करण्यात घाई करावी आणि पापकर्म करण्यापासून मन वळवावे. त्रास दूर केल्यानेच मन शुद्ध आणि नैसर्गिक बनते.ज्या व्यक्तीचे मन शांत असते, त्याचे बोलणे आणि कृतीही चांगली असते. बौद्ध धर्मग्रंथांचे वाचन करा, त्यांचे चिंतन करा आणि आचरणात आणून जीवन कल्याणकारी करा, असे दलाई लामा म्हणाले. (Latest Marathi News)

युद्धाच्या माध्यमातून कोणताही प्रश्न सोडवणे ही जुनी पद्धत झाली आहे, आता अहिंसा हाच एकमेव मार्ग आहे. माणुसकीत एकतेची भावना निर्माण केली पाहिजे. या प्रयत्नांतून आपण अधिक शांततामय जग निर्माण करू शकू.संवादातून समस्या आणि मतभेद उत्तम प्रकारे सोडवले जातात, असे ते म्हणाले.

सर्वजण शांततेबद्दल बोलतात पण ही शांतता आकाशातून पडणार नाही, शांतता मनातूनच निर्माण होईल. जर आपण इतरांच्या कल्याणाची भावना विकसित केली तर आपले मन आपोआप शांत आणि आनंदी होईल. शारीरिक आणि मानसिक आरोग्यही यावर अवलंबून असते.या महत्त्वाच्या तत्त्वांद्वारे आपण आपल्या स्वार्थी प्रवृत्तींपासून मुक्ती मिळवू शकतो.

Dalai Lama
CM Shinde : पाणबुडी प्रकल्प गुजरातला जाणार का? मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com