कोरोनानंतर आता पुन्हा एकदा जगांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने बर्ड फ्लू प्रकरणांमध्ये चिंताजनक वाढ झाल्यानंतर बर्ड फ्लूमुळे पहिल्या मानवी मृत्यूची पुष्टी केली आहे. मेक्सिकोमधील रहिवासी असलेल्या पीडित महिलेचा एव्हियन इन्फ्लूएंझा ए (एच5एन2) च्या लक्षणे ग्रस्त असलेल्या आजारपणात मृत्यू झाला आहे. या बाबतीतील तपशील आणि त्याचा मानवांवर होणारा परिणाम अद्याप तपासला जात आहे; या घटनेने आता जागतिक आरोग्य संघटनेला सतर्क केले आहे.
मेक्सिकन आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, डब्ल्यूएचओने पुष्टी केली आहे की, 24 एप्रिल रोजी “ताप, धाप लागणे, अतिसार, मळमळ आणि सामान्य अस्वस्थता” या लक्षणांमुळे 59 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला.
WHO नुसार, “जागतिक स्तरावर नोंदवलेला इन्फ्लूएंझा A(H5N2) विषाणूच्या संसर्गाची ही पहिली प्रयोगशाळेने पुष्टी केलेली मानवी घटना आहे आणि मेक्सिकोमधील या महिलेला प्रथम एव्हीयन H5 विषाणूचा संसर्ग झाला आहे.”
बर्ड फ्लूच्या परिस्थितीचे वर्णन करताना जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले की, त्यांना प्रथम 23 मे रोजी या प्रकरणाची माहिती मिळाली. "या महिलेचा पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांशी यापूर्वी कोणताही संपर्क नव्हता. पीडित महिलेला पोल्ट्री किंवा इतर प्राण्यांच्या संपर्कात आल्याचा कोणताही इतिहास नव्हता."
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एव्हीयन फ्लूची गंभीर लक्षणे दिसण्यापूर्वी 59 वर्षीय महिला तीन आठवडे अंथरुणाला खिळलेली होती. तज्ज्ञांनी यापूर्वी बर्ड फ्लूच्या वाढत्या प्रकरणांबद्दल चिंता व्यक्त केली आहे, त्यांची क्षमता कोरोनाव्हायरसपेक्षा 100 पट अधिक शक्तिशाली आहे.
सौम्य फ्लू सारखी वरच्या श्वसनमार्गाची लक्षणे
डोळा लाल होणे
ताप (100ºF [37.8ºC] किंवा त्याहून अधिक तापमान) किंवा ताप येणे
खोकला
घसा खवखवणे
वाहणारे किंवा भरलेले नाक
स्नायू किंवा शरीर दुखणे
डोकेदुखी
थकवा
श्वास लागणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे
अतिसार
मळमळ
उलट्या होणे
बर्ड फ्लू (Bird Flu) अथवा ज्याला एव्हीयन इन्फ्लूएंझा असं म्हटलं जातं हा रोग बहुतांश वेळेला पक्ष्यांमध्ये आढळतो. मात्र, इतर प्राणी तसेच माणसांना संक्रमित करण्याची क्षमता या विषाणूमध्ये निश्चितच आहे. पक्ष्यांना मोठ्या प्रमाणावर मारणाऱ्या विषाणूचा H5N1 हा स्ट्रेन कॉमन आहे. अर्थातच कोरोनामुळे आता तुम्हाला विषाणू, त्याचा स्ट्रेन, त्याचा प्रकार या सामान्य बाबी आता समजल्याच असतील. जसा कोरोनाचा नवा स्ट्रेन सध्या धुमाकूळ घालतो आहे, अगदी तसेच बर्ड फ्लूच्या विषाणूचे देखील इतर अनेक स्ट्रेन आहेत.
जसे की H5N7 आणि H5N8 असे... आणि हेदेखील संसर्गजन्य तसेच जीवघेणे आहेत. हा व्हायरस सर्वांत आधी गीस या पक्ष्यामध्ये आढळला... तो सुद्धा चीनमध्ये... चीन ही विषाणूंची जननी आहे.. असं छातीठोकपणे म्हणायला आता काही हरकतच उरली नाहीये... आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने हा विषाणू आणि हा रोग जगभरात सापडत गेला. भारतामध्ये हा विषाणू पहिल्यांदा महाराष्ट्रात सापडला होता. 2006 मध्ये नंदूरबारमध्ये याची पक्ष्यांना लागण झाली होती. सध्या राजस्थान, मध्य प्रदेश आणि केरळमध्ये आढळलेल्या पक्ष्यांच्या शरिरामध्ये H5N8 हा स्ट्रेन सापडला आहे तर हिमाचल प्रदेशातील पक्ष्यांच्या चाचणीमध्ये H5N1 हा विषाणू सापडला आहे.
बर्ड फ्लूचा H5N1 हा विषाणू पक्ष्यांच्या संपर्कातून माणसांमध्ये प्रवेश करु शकतो. जगात याप्रकारची केस सर्वांत आधी अर्थातच चीनमध्ये आढळली होती. 1997 मध्ये हाँगकाँगमध्ये बर्ड फ्लूने संक्रमित पहिला माणूस सापडला होता. हा पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारा कामगार होता, ज्याला पक्ष्यांच्या संपर्कामुळे हा संसर्ग झाला होता.
हा विषाणू माणसांसाठी धोकादायक आहे का? तर हो, आहे. माणसांमध्ये या विषाणूच्या संक्रमणामुळे होणारा जास्तीतजास्त मृत्यूदर हा 60 टक्क्यांइतका आहे. आणि म्हणूनच हे चिंतेचे कारण आहे. या विषाणूच्या सध्याच्या स्वरुपामध्ये तरी माणसांकडून माणसांकडे याचे संक्रमण होण्याबाबत कसलीही उदाहरणे आढळली नसल्याने त्याबाबत माहिती नाहीये. म्हणजे ज्यांनी पक्ष्यांशी संपर्क केला आहे अथवा जे अनावधानाने पक्ष्यांच्या संपर्कात आलेत, त्यांनाच हा संसर्ग झाल्याचे सध्यातरी आढळले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.