Expensive Potato: आपल्या दैनंदिन आहारात सर्वाधिक वापरला जाणारा बटाटा सर्वांच्याच परिचयाचा आहे. बटाट्याची साधारण किंमत फार तर ३० ते ७० रुपये किलो असते. मात्र आज आपण अशा बटाट्याविषयी जाणून घेणार आहोत ज्याची किंमत ऐकून तुम्हीही चक्रावून जाल.
जगातील सगळ्यात महागड्या बटाट्याची किंमत तब्बल पन्नास हजार रुपये किलो आहे. बटाट्याला भाज्यांचा राजा मानलं जातं. Le Bonnotte असे या बटाट्याचे नाव असून याची शेती फ्रांसमधील Ile de Noirmoutier मध्ये केली जाते.
जगातील पाच महागड्या भाज्यांमध्ये या बटाट्याचा समावेश
potatoreview वेबसाइटच्या मते, या बटाट्याची किंमत प्रति किलो जवळपास ४४,२४२ रुपये किलो आहे. ही किंमत कमी जास्त होत असते. जागतिक कंपनी कोंडे नास्ट ट्रॅवलने या बटाट्याचा जगातील ५ महागड्या भाज्यांमध्ये समावेश करून घेतलाय.
या बटाट्याची गणना जगातील सगळ्यात दूर्लभ प्रजातींमध्ये केली जाते. हा बटाटा बाजारात प्रत्येक वर्षात फक्त दहा दिवस उपलब्ध असतो. याची शेती करताना विशेश काळजी घ्यावी लागते. याचं रोप लावल्यानंतर तिन महिन्यांनी खोदून बटाटे काढले जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.