असं जंगल तुम्हाला माहितीये का ? इथं रात्रभर ओरडतात आत्मा, ना मिळतं मोबाईलला नेटवर्क, ना समजते दिशा

असं जंगल तुम्हाला माहितीये का ? इथं रात्रभर ओरडतात आत्मा, ना मिळतं मोबाईलला नेटवर्क, ना समजते दिशा
Updated on

जपानमध्ये एक कुख्यात जंगल आहे. हे जंगल तिथे होणाऱ्या गुढ आत्महत्यांसाठी कुख्यात आहे. हे जंगल 'सुसाईड फॉरेस्ट' म्हणून ओळखलं जातं. या जंगलबद्दल अनेक रंजक भयकथा आहेत. मात्र तरीसुद्धा ज्यांना आयुष्यात ऍडव्हेंचर हवंय अशी मंडळी इथं हजेरी लावत असतात. 

"आपल्या परिवाराबद्दल, मुलांबद्दल आणि आपल्या आयुष्याबद्दल विचार करा, तुमचं आयुष्य तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला दिलेलं सर्वात अनमोल गिफ्ट आहे" 

तुम्हाला सूचित करणारी ही पाटी जपानच्या 'ऑकिगहरा' जंगलाच्या प्रवेशद्वारावर दिसेल. या जंगलाला संपूर्ण जगभरात 'सुसाईड फॉरेस्ट' या नावाने ओळखलं जातं. जर तुम्हाला या जंगलाबाबत ठाऊक नसेल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे हिरवं-गार जंगल रोज सकाळी छान फेरफटका मारण्यासाठी नव्हे तर या जंगलाशी जोडल्या गेलेल्या सुसाईड स्टोरीजसाठी कुप्रसिद्ध आहे. जगभरात सर्वात कुप्रसिद्ध असलेल्या आत्महत्यांच्या ठिकाणांमध्ये याचा दुसरा नंबर लागतो. हे जंगल जपानची राजधानी टोकियोपासून अवघ्या दोन तासांवर आहे.    

नक्की कुठं वसलंय हे जंगल ?

हे जंगल फुजी डोंगर रांगांमध्ये उत्तर-पश्चिमेला वसलंय. हे जंगल तब्बल ३५ स्केअर किलोमीटर परिसरात वसलंय. हे जंगल एवढं दाट आहे की, याला झाडांचा समुद्र म्हणूनही ओळखलं जातं. हे जंगल एवढं गर्द आहे की,  या जंगलामध्ये हरवून जाणं सहज शक्य आहे आणि इथून बाहेर पडणं सर्वात कठीण.  

जंगलाबाबतच्या रंजक भयकथा : 

जपानी पौराणिक कथा सांगतात की, या जंगलात मेलेल्या लोकांच्या आत्मांचा निवास आहे. अधिकृत रेकॉर्ड्स पाहिलेत तर, २००३ मध्ये या जंगलातून १०५ मृतदेह बाहेर काढले गेलेत. यापैकी सर्वाधिक मृतदेह भीषण पद्धतीने सडलेल्या अवस्थेत किंवा इथल्या जनावरांनी खाल्लेल्या अवस्थेत होते. जपानमधील धार्मिक लोकांच्या माहितीनुसार या जंगलात झालेल्या आत्महत्यांमुळे इथे कायम गुढ गोष्टी घडतात. 

दिशादर्शक यंत्र आणि मोबाईल  नेटवर्कही चालत नाही : 

जा जंगलाबाबत सर्वात आश्चर्यचकित करणारी बाब म्हणजे, या जंगलात दिशादर्शक यंत्र 'कंपास' किंवा मोबाईल फोन चालत नाही. जा जंगलात तुम्ही दिशादर्शकाचा वापर केला तर कंपास तुम्हाला चिंकीच्या दिशा दाखवतो. इथे मोबाईल नेटवर्क देखील येत नाही. या जंगलात अशी माती आहे जिथं गुरुत्त्वीय लोह आहे. त्यामुळे जा जंगलात शिरल्यानंतर बाहेत पडणे मुश्किल होते.  

संपूर्ण रात्र ओरडतात आत्मा : 

इथल्या लोकांची अशी धारणा आहे की, इथे कुणी आत्महत्या केली तर त्यांचं शव जा जंगलात पडून राहता कामा नये. या जंगलात काम करणारे नागरिक या जंगलात आत्महत्या करणाऱ्यांच्या मृतदेहांना पोलिसांच्या स्वाधीन करतात. इथले नागरिक या जंगलबद्दल म्हणतात की, एखाद्याने आत्महत्या केल्यानंतर त्याचं शव जा जंगलात पडून राहणं योग्य नाही. त्या व्यक्तीची आत्मा संपूर्ण रात्रभर मोठ्याने ओरडत राहते आणि स्वतःच्या शरीराला तिथून घेऊन जाते. 

याव्यतिरिक्त या हे जंगल अत्यंत सुंदर आहे. या जंगलात हायकर्स आणि ऍडव्हेंचर प्रेमी मोठ्या प्रमाणात येतात. या जंगलात दिशा समजत नाहीत म्हणून इथे येणारे लोकं आपल्या सोबत प्लस्टिक टेप्स ठेवतात. या टेप्स झाडांवर लावून त्यांना जंगलात दिशा शोधणं सोपं होतं. बहुदा इथे एकटं-दुकटं  कुणीही येत नाही. याशिवाय या जंगलात तब्बल तीनशे वर्षांपेक्षाही जुनी काही अद्भुत झाडं देखील आहेत.

worlds scariest Aokigahara forest known for its paranormal activities

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.