फ्लोरिडा : गेल्या पाचच दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष राहिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. मात्र, आधीसारखेच त्यांना ऑनालाईन माध्यमातून अजूनही ट्रोल करण्यात येत आहे. कदाचित आता होणारे ट्रोलिंग हे यापूर्वी केल्या जाणाऱ्या ट्रोलिंगहून देखील अधिक असण्याची शक्यता आहे. 20 जानेवारी रोजी डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या पदावरुन पायउतार व्हावं लागलं.
याप्रकारचे ऑनलाईन ट्रोलिंग ट्रम्प यांच्यासाठी काही नवीन नाही. किंबहुना त्यांना त्याची सवयच झाली आहे. मात्र, याता त्यांची खिल्ली उडवणाऱ्यांनी तसेच त्यांच्या विरोधकांनी एका वेगळ्या उंचीवर जाऊन ट्रोलिंगला सुरवात केल्याचे दिसून येत आहे. हो... हो... हे ट्रोलिंग खऱ्या अर्थानेच वेगळ्या उंचीवरचं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं घर फ्लोरिडामध्ये आहे. त्यांच्या घराच्या वर दोन विमाने एक हटके असा संदेश घेऊन उडताना दिसून आली आहेत. 'Worst President Ever' and 'Pathetic Loser' असा संदेश देणारी दोन विमाने ट्रम्प यांच्या घरावरुन उडताना दिसून आली आहेत. मार-ला-गो रेसॉर्टच्या जवळ ही दोन विमाने दिसून आली. 'आजवरचे सर्वांत वाईट पंतप्रधान' आणि 'दयनियरित्या पराभूत झालेला' असं म्हणून ट्रोल करण्यासाठी वापरलेला हा मार्ग अत्यंत हटके असल्याने त्याची विशेष चर्चा होतान दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अद्याप या उंचीवर जाऊन ट्रोलिंग करण्याचा पराक्रम कुणी केलाय माहिती उपलब्ध झाली नाहीये. सोशल मिडीयात आलेल्या काही प्रतिक्रियांवरुन हे दिसून आलं होतं की फ्लोरिडातील अनेक लोक डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यावर तिथे रहायला येणार म्हणून उत्सुक होते. तर काही लोक त्यांच्या या आगमनावर नाखुश असल्याचंही दिसून आलं होतं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.