X Ban : 'या' देशात 'एक्स'वर येणार बंदी! समाजात 'घाण' पसरवत असल्याचा आरोप; भारतातही...

काही दिवसांपूर्वी एक्सने अडल्ट कंटेंटला मंजुरी दिलेली आहे. त्यावरुन इंडोनेशिया सरकारने मस्क यांना इशारा दिलाय. सरकारकडून म्हटलंय की, जर मस्क यांनी एक्सशी संबंधित अडल्ट पॉलिसी बदलली नाही तर देशामध्ये एक्सवर बंदी घातली जाईल. याची माहिती इंडोनेशियाच्या प्रसारण आणि माहिती खात्याचे मंत्री बुडी एरी सेतियादी यांनी दिली आहे.
X Ban
X Banesakal
Updated on

Elon Musk : जेव्हापासून इलॉन मस्क हे जुनं ट्वीटर आणि नवीन एक्सचे मालक बनले आहेत तेव्हापासून काहीना काही वाद उत्पन्न होत आहेत. सध्या त्यांचं एक्स आणि ते स्वतः चर्चेत आहेत त्यांच्या पॉलिसीमुळे. इंडोनेशिया सरकारने एक्सच्या पॉलिसीला कडाडून विरोध केला आहे.

काही दिवसांपूर्वी एक्सने अडल्ट कंटेंटला मंजुरी दिलेली आहे. त्यावरुन इंडोनेशिया सरकारने मस्क यांना इशारा दिलाय. सरकारकडून म्हटलंय की, जर मस्क यांनी एक्सशी संबंधित अडल्ट पॉलिसी बदलली नाही तर देशामध्ये एक्सवर बंदी घातली जाईल. याची माहिती इंडोनेशियाच्या प्रसारण आणि माहिती खात्याचे मंत्री बुडी एरी सेतियादी यांनी दिली आहे.

X Ban
MVA Meeting : काँग्रेस स्वबळावर लढणार? 'मविआ'च्या बैठकीला पटोले अनुपस्थित, तर वडेट्टीवारांना निमंत्रणच नाही

२००८ मध्ये अशा कंटेंटविरोधात कायदा तयार झाला

इंडोनेशियामध्ये अडल्ट कंटेंटविरोधात २००८ मध्ये कायदा तयार झाला होता. तेव्हापासून देशामध्ये अशा कंटेंटला बंदी आह. एक्सच्या नवीन पॉलिसीनुसार युजर्स आपल्या अकाऊंटवरुन अडल्ट कंटेंट शेअर करु शकतात आणि बघूही शकतात.

X Ban
Ashok Saraf: "ते माझे आवडते नेते आहेत, त्यांनी माझं काम..."; अशोक सराफ यांच्याकडून शरद पवारांचे कौतुक

दरम्यान, भारतातदेखील एक्सवर बंदी येऊ शकते. कारण भारतातही अशा कंटेंटला बंदी आहे आणि या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मात्र सर्रासपणे अडल्ट कंटेंट प्रसारित होत आहे. यावर भारत सरकारची नेमकी भूमिका काय, हे लवकरच स्पष्ट होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.