Coronavirus : जनआंदोलनापुढं चीन सरकार पहिल्यांदाच झुकलं; बीजिंगसह अनेक शहरांतील कोरोना निर्बंध शिथिल!

जनआंदोलनामुळं चीन सरकारला आपला निर्णय बदलावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Xi Jinping
Xi Jinpingesakal
Updated on
Summary

जनआंदोलनामुळं चीन सरकारला आपला निर्णय बदलावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कोरोनाचा (Coronavirus in China) सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या कठोर निर्बंधांविरोधात चीनमध्ये मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर उतरले आहेत. यामुळं शी जिनपिंग (Xi Jinping) सरकारला आता माघार घ्यावी लागलीय.

जनआंदोलनामुळं चीन सरकारला आपला निर्णय बदलावा लागण्याची ही पहिलीच वेळ आहे. चीन सरकारचं (Chinese Government) म्हणणं आहे की, झिरो कोविड धोरण लागू राहील. परंतु, आता काही निर्बंध शिथिल केले जातील. बीजिंगमधील अपार्टमेंटकडं जाणारे रस्ते ब्लॉक केले जाणार नाहीत. याशिवाय, ग्वांगझूमध्ये सामूहिक चाचणीचे नियमही शिथिल करण्यात येतील.

Xi Jinping
Apple नं आपल्या App Store वरून Twitter काढून टाकण्याची दिली धमकी; मस्कचा गंभीर आरोप

बीजिंग प्रशासनाच्या (Beijing Government) निर्देशानुसार, बीजिंगमधील प्रतिबंधात्मक धोरण शिथिल करण्यात येतील. आता गेट अडवले जाणार नाहीत आणि कोणाच्याही प्रवेशाला अडथळा होणार नाही. चीनमध्ये सरकारविरोधातील असंतोष काही महिन्यांपासून भडकत आहे. मात्र, शिनजियांग प्रांतातील उरुमकी भागात लागलेल्या आगीत 10 जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही निदर्शनं उघड झाली. आंदोलन सुरू झाल्यावर शहरा-शहरांत निदर्शनं दिसू लागली. बीजिंग, शांघाय, शिनजियांग, वुहानसह अनेक शहरांतील विद्यापीठांमध्ये विद्यार्थी आणि इतरांनी सरकारविरोधात आवाज उठवला.

Xi Jinping
दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

या आंदोलनांमुळं जगभरात चीनची प्रतिमा मलिन होत आहे. युरोप, आशिया आणि अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये चिनी नागरिकांच्या समर्थनार्थ निदर्शनं करण्यात आली आहेत. हाँगकाँगच्या सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये चीन सरकारनं लादलेल्या निर्बंधांचा आंदोलकांनी निषेध केला. याशिवाय, तुर्कस्तानमध्येही चीन सरकारविरोधात निदर्शनं झाली आहेत. टोकियोमध्येही जवळपास 100 लोकांनी रेल्वे स्टेशनवर चीनविरोधात निदर्शनं केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.