Xiang Yang Hong 03 Ship Marathi News : चीनचं एक संशोधन जहाज गुरुवारी मालदीवच्या किनाऱ्यावर दाखल झालं. यामुळं मालदीव-भारत यांच्यातील तणावाच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर चीनचा हिंदी महासागरात वावर वाढल्यानं भारतासाठी हे चिंतेचं कारण ठरु शकतं.
ग्लोबल शिप ट्रॅकिंग डेटानुसार केवळ तीन महिन्यातच आणखी एक संशोधन जहाज अशा प्रकारे हिंदी महासागरात दाखल झाल्यानं भारतासाठी सुरक्षेच्यादृष्टीनं ही काळजीत टाकणारी बाब आहे. (Xiang Yang Hong 03 Ship Chinese research ship arrives in Maldives amid Indian Ocean security concerns)
एका अमेरिकन थिंक टँकनं नुकतंच चीनच्या या मोहिमांबाबत भाष्य करताना म्हटलं होतं की, चीनचं नौदल अशा मोहिमांद्वारे मिळालेल्या माहितीचा फायदा घेऊ शकतं. जानेवारी महिन्यात या थिंक टँकनं ही टिप्पणी केली होती, त्यानंतर आज स्थिती पहायला मिळाली आहे. या थिंक टँकनं असंही म्हटलं होतं की, चीनची जहाजांनी भारत, मालदीव आणि श्रीलंका या विशेष आर्थिक क्षेत्रांच्या बाहेर पाण्याचं सर्वेक्षण करण्यात तीन आठवड्यांहून अधिक वेळ घालवला होता, असं जहाज-ट्रॅकिंग डेटावरुन दिसून येतं. (Latest Marathi News)
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं की, या जहाजाचं संशोधन 'केवळ शांततापूर्ण उद्देशांसाठी' होतं, ज्यामुळं वैज्ञानिक समज वाढेल. पण अलिकडच्या काळात, भारतानं हिंद महासागरात चीनच्या संशोधन जहाजांच्या उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे, जरी ही जहाजं लष्करी नसली तरी. एका भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यानं यापूर्वीच म्हटलं आहे की, ही चीनी जहाजं 'दुहेरी-वापर' आहेत, म्हणजे त्यांनी गोळा केलेला डेटा नागरी आणि लष्करी दोन्ही हेतूंसाठी वापरला जाऊ शकतो. (Marathi Tajya Batmya)
शियांग यांग हाँग 03 या जहाजानं अनेकवेळा हिंदी महासागरात सैर केली आहे. ते 2021 मध्ये इंडोनेशियातील सुंदा सामुद्रधुनीतून निघालं होतं, त्यावेळी इंडोनेशियाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली होती. भारताच्या जवळच्या श्रीलंकेत चिनी संशोधन जहाजही थांबली आहेत. 2022 मध्ये, युआन वांग 5, रॉकेट आणि क्षेपणास्त्र प्रक्षेपणांचा मागोवा घेण्यास सक्षम असलेलं एक लष्करी जहाज कोलंबोमध्ये दाखल झालं होतं, ज्यामुळं भारताची चिंता वाढली होती.
ऑक्टोबर २०२३ मध्ये चिनी संशोधन जहाज श्रीलंकेत दाखल झाले होतं, ज्यामुळं भारताच्या चिंता पुन्हा वाढल्या होत्या. परंतु जानेवारीमध्ये, श्रीलंकेनं परदेशी संशोधन जहाजांवर वर्षभराची स्थगिती लादली आणि प्रभावीपणे चीनला विरोध दर्शवला होता. (Latest Maharashtra News)
Xiang Yang Hong 03 या जहाजाचं आज झालेलं आगमन हे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझ्झू यांच्या जानेवारीत चीनच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचं मानलं जात आहे. या भेटीमुळं मालदीव आणि चीनचे राजनैतिक संबंध सुधारले, चीननं 920 दशलक्ष युआन ($128 दशलक्ष) मालदीवला देऊ केले होते. मालदीवनं यावर म्हटलं आहे की, जहाज आपल्या पाण्यात कोणतेही संशोधन करणार नाही, फक्त जहाजावरील कर्मचाऱ्यांना पर्यटन आणि जहाजात इंधन भरण्यासाठी थांबणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.