Video: भारताकडं निघालेलं जहाज येमेनच्या हुती बंडखोरांकडून हायजॅक! थरारक व्हिडिओ केला शेअर

तुर्कीहून हे जहाज भारताच्या दिशेनं निघालं होतं ते काल हायजॅक करण्यात आलं, याचा दोन मिनिटांचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे.
Ship Hijack
Ship Hijack
Updated on

नवी दिल्ली : तुर्कीहून भारताकडं निघालेलं एक मालवाहू जहाज येमेनच्या हुती बंडखोरांनी काल (सोमवार) हायजॅक केलं होतं. ते कसं हायजॅक केलं याचा थरारक व्हिडिओ आता समोर आला आहे. या बंडखोरांनीच हा व्हिडिओ शेअर केला आहे. (Yemen Houthi Rebels Share Alleged Video Of India Bound Ship Hijacking)

Ship Hijack
World Television Day 2023 : टीव्हीशी निगडीत ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

का केलंय हायजॅक?

मालवाहू जहाज इस्राइलचं असल्यानं त्याचं अपहरण करण्यात आल्याचं हुती बंडखोरांनी म्हटलं आहे. पण इस्राइलनं हे नाकारलं असून या जहाजावर एकही इस्रायली नागरिक नाही असा दावा केला आहे. हे बंडखोर हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जहाजाच्या डेकवर उतरले. त्यावेळी जहाजावर कोणीही नव्हतं, त्यानंतर घोषणाबाजी करत त्यांनी गोळीबारही केला. (Latest Marathi News)

Ship Hijack
World Television Day 2023: दिवसभराचा थकवा दूर करणाऱ्या टेलिव्हिजनची सुरुवात कधीपासून झाली? जाणून घ्या

व्हिडिओत नेमकं काय?

हेलिकॉप्टरच्या माध्यमातून जहाजावर उतरल्यानंतर शस्त्रधारी बंडखोर 'व्हील हाऊस' आणि नियंत्रण केंद्रावर त्यांनी कब्जा केला आणि ते डेकवर पळताना दिसत आहेत. तसेच गोळीबार केल्यानं डेकवर असलेले काही क्रू मेंबर्स आपले हात वर करुन सरेंडर झाल्याचं दिसत आहे. तसेच इतर बंडखोर हे जहाजावर गोळीबार करत पळताना दिसत आहेत. (Marathi Tajya Batmya)

Ship Hijack
OpenAI कंपनीत वादळ! 500 कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत

सध्या जहाजाची स्थिती काय?

वृत्तसंस्था एएफपीनं समुद्री सुरक्षा कंपनी अंब्रे आणि एक येमेनी स्त्रोतांच्या माहितीनुसार, या जहाजाला होदेदा प्रांतातील येमेनच्या सलीफ या बंदरावर पाठवलं आहे. या ठिकाणीचं जहाजानं नांगर टाकला आहे. (Latest Marathi News)

Ship Hijack
OpenAI कंपनीत वादळ! 500 कर्मचारी राजीनामा देण्याच्या तयारीत

हुती बंडखोरांचं म्हणणं काय?

हुती बंडखोरांचे प्रवक्ते मोहम्मद अब्दुल सलाम यांनी रविवारी ट्वीट करुन सांगितलं होतं की, "जोपर्यंत इस्राइल गाझावरील हल्ले थांबवत नाही तोपर्यंत त्यांच्यावर आम्ही समुद्री हल्ले करत राहू. बहामास-फ्लॅगचं हे जहाज विविध देशांमध्ये सुमारे २५ लोकांना घेऊन निघालं होतं"

इस्राइलनं केली निंदा

इस्राइलनं जहाजाच्या हायजॅकिंगची निंदा केली आहे. तसेच इराणवर टीका केली आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेत्यानाहू यांच्या कार्यालयानं ट्विट करत म्हटलं की, इस्राइल एक आंतरराष्ट्रीय जहाजाविरोधातील हल्ल्याची कडक शब्दांत निंदा करतो. इराणी दहशतवादाचं हे आणखी एक उदाहरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.