घरी जा, तू महिला आहेस; अँकरला तालिबान्यांनी रोखले

Afghanistan Crisis
घरी जा, तू महिला आहेस; अँकरला तालिबान्यांनी रोखले
Updated on

Afghanistan Crisis काबूल : तू महिला आहेस, घरी जा, असे दटावत तालिबान्यांनी प्रसिद्ध महिला अँकर व पत्रकार शबनम दावरन यांना कार्यालयात येण्यापासून रोखले. रेडिओ टेलिव्हीजन अफगाणिस्तान (आरटीए) या सरकारी वाहिनीसाठी त्या काम करतात.

शबमन यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या आरटीए पाश्तो न्यूजसाठी काम करतात. व्हिडिओच्यावेळी त्यांनी हिजाब घातला होता. कार्यालयाचे ओळखपत्र दाखवीत त्यांनी सांगितले की, काम सुरु ठेवण्यासाठी मला कार्यालयात जायचे होते, पण मला प्रवेश नाकारण्यात आला. आता राजवट बदलली आहे. त्यामुळे तू काम करू शकत नाहीस असे मला सांगण्यात आले. खरे तर सत्तांतरानंतर मी हार पत्करली नव्हती. मला कार्यालयात जाऊन काम करायचे होते. मी कार्यालयापाशी गेले तेव्हा केवळ पुरुष कर्मचाऱ्यांना ओळखपत्र तपासून आत सोडण्यात आले.

घरी जा, तू महिला आहेस; अँकरला तालिबान्यांनी रोखले
सात गुन्हे दाखल करा नाहीतर 70 हजार, मला फरक पडत नाही- राणे

आणखी एकीला रोखले

दरम्यान, टोलो न्यूजच्या वृत्तानुसार आरटीएच्या आणखी एक महिला पत्रकार खदीजा यांनाही काम करण्यास मनाई करण्यात आले. खदीजा यांनी सांगितले की, मी कार्यालयापाशी गेले, पण मला आत जाऊ देण्यात आले नाही. तालिबानने नेमलेल्या नव्या संचालकांशी मी संपर्क साधला. आमच्या कामाबद्दल लवकरच निर्णय होईल असे तालिबानकडून मला सांगण्यात आले. आता कार्यक्रम बदलण्यात आले आहेत. तालिबान त्यांना हवे असलेल्या कार्यक्रमांचे प्रसारण करतात. एकही महिला सूत्रसंचालक किंवा पत्रकार कामावर नाहीत.

घरी जा, तू महिला आहेस; अँकरला तालिबान्यांनी रोखले
राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेप्रकरणी 19 गुन्हे

बीबीसी पत्रकाराचा व्हिडिओ

बुधवारी जलालाबाद येथे निदर्शनांचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना तालिबान्यांनी क्रूरपणे मारहाण केली. त्यामुळे ते रडत होते. तेव्हाचा व्हिडिओ बीबीसी वर्ल्ड सर्व्हिसचे पत्रकार हफीझुल्लाह मारूफ यांनी पोस्ट केला आहे. मारूफ म्हणतात की, केवळ एका मोर्चाचे वार्तांकन करताना पत्रकारांवर अशी वेळ आल्याचे पाहणे ह्रदयद्रावक आहे. आता अफगाणिस्तानमध्ये पत्रकारांना अशी मारहाण होत असून तालिबानकडून अशी वागणूक दिली जात आहे. पत्रकारिता हा काही गुन्हा नाही.

आणखी एका व्हायरल व्हिडिओनुसार एक तालिबानी एका महिला पत्रकाराला लाथ मारताना आणि तिच्या अंगावर उभा राहात असताना दिसते. त्यावेळी ती महिला वेदनेने कळवळत होती. हा व्हिडिओ जलालाबादमधील असल्याचेसमजते.

घरी जा, तू महिला आहेस; अँकरला तालिबान्यांनी रोखले
घरगुती गॅस सिलिंडर महागला; आजपासून मोजावे लागणार इतके रुपये

माझा आवाज ऐकणाऱ्यांनो...

प्रसार माध्यमात गेली सहा वर्षे सक्रिय असलेल्या शबनम यांनी या व्हिडिओत जिवाला धोका असल्याची भीती व्यक्त केली. श्रोत्यांना विनवणी करताना त्या म्हणाल्या की, जे कुणी माझा आवाज ऐकत आहेत, जर जगाने माझा आवाज ऐकला, तर कृपा करून आम्हाला मदत करा. आमचा जीव धोक्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.