''झिका व्हायरस धोकादायक उद्रेकाच्या उंबरठ्यावर''

कोरोनानंतरची पुढील महामारी झिका आणि डेंग्यूसह कीटक-जनित रोगजनकांमुळे होऊ शकते.
zika virus
zika virussakal
Updated on

Zika Virus : एकीकडे कोरानाच्या नव नव्या व्हेरिएंटमुळे (Corona New Variant) जगाची चिंता वाढलेले असताना आता झिका विषाणू (Zika Virus) अधिक संसर्गजन्य होण्यासाठी उत्परिवर्तन होऊ शकतो अशी भीती यूएस संशोधकांनी व्यक्त केली आहे. संशोधकांचा हा शोध जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या महिन्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या इशाऱ्याशी सुसंगत आहे. कोरोनानंतरची पुढील महामारी झिका आणि डेंग्यूसह कीटक-जनित रोगजनकांमुळे होऊ शकते, असा इशारदेखील जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे जगाची चिंता काही अंशी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, यूएस मधील ला जोला इन्स्टिट्यूट फॉर इम्युनोलॉजीच्या (LJI) संशोधकांनी झिकाचे नवीन NS2B I39V/I39T नवीन उत्परिवर्तन ओळखले असल्याचे म्हटले आहे. (Zika Virus News) Zika may be a step away from dangerous outbreak, claims US researchers

zika virus
''ठाकरे कुटुंबातील आणखी एक घोटाळा उद्या उघड करणार''

यूएसमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात उंदीर आणि डास या दोघांमध्येही झिका विषाणूची प्रतिकृती बनवण्याची क्षमता वाढवल्याचे आढळून आले आहे. एवढेच नव्हे तर, या झिका प्रकाराची मानवी पेशींमध्ये (Human Body Cells) वाढलेली प्रतिकृतीदेखील आढळली आहे. त्यामुळे संपूर्ण जगाने या झिका विषाणू प्रकाराच्या उदयावर लक्ष ठेवले पाहिजे असे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. 2016 मध्ये डासांद्वारे होत असलेल्या झिका विषाणूमुळे जागतिक वैद्यकीय आणीबाणी निर्माण झाली. यामुळे हजारो बाळांना त्यांच्या मातांना गरोदर असताना संसर्ग झाल्यामुळे मायक्रोसेफली सारख्या जन्मजात दोषांसह बाळांचा जन्म झाला. (Zika Virus Symptoms)

zika virus
Ranbir Alia wedding : बघा कोण आहेत आलिया आणि रणबीरच्या लग्नाचे वऱ्हाडी..

संशोधनात झिका विषाणूसाठी एकल अमीनो ऍसिड बदल घेणे तुलनेने सोपे आहे. ज्यामुळे विषाणू स्वतःच्या अधिक प्रत बनवू शकतो आणि संक्रमण अधिक सहजपणे होण्यास मदत करतो असे आढळून आले असून, हे एकच उत्परिवर्तन झिका विषाणू वाढवण्यासाठी पुरेसे आहे. असे मत मेक्सिकोमधील ग्वाडालजारा विद्यापीठातील प्राध्यापक जोस एंजल रेग्ला-नावा यांनी व्यक्त केले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, डेंग्यू (Dengue) ताप दरवर्षी 130 देशांमध्ये 390 दशलक्ष लोकांना संक्रमित करतो. मात्र, झिका व्हायरस किमान 89 देशांमध्ये आढळून आला आहे. खरं तर, झिका विषाणू इतके समान आहेत की डेंग्यूच्या आधीच्या संसर्गामुळे निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती झिकापासून संरक्षण देऊ शकते. परंतु दुर्दैवाने, आता नव्याने ओळखलेल्‍या झिका प्रकाराचा विकास (Zika New Variant) डेंग्यूच्‍या संसर्गाच्‍या आधीच्या संसर्गामुळे मिळणारी क्रॉस-संरक्षणात्मक प्रतिकारशक्ती परिणामकारक राहिलेली नसल्याचे उंदरांवर करण्यात आलेल्या अभ्यासादरम्यान समोर आली आहे. त्यामुळे जर हा विषाणू अशाच पद्धतीने बदलत राहिल्यास वास्तविक जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.