Zombie Drug In Britain : अमेरिकेनंतर आता ब्रिटनमध्येही झॉम्बी ड्रगचा कहर; तब्बल 11 जणांचा गेला बळी.. काय आहे प्रकार?

झॉम्बी शरीरात पसरला तर दिसतात ही लक्षणे
Zombie Drug In Britain
Zombie Drug In Britainesakal
Updated on

Zombie Drug In Britain :  

कोरोना व्हायरसने जगाला हादरवून सोडलं होतं. आता तशाचप्रकारचा एका घातक झॉम्बी ड्रग जगभरातल्या लोकांचे बळी घेत आहे. अमेरिका, युरोपनंतर आता ब्रिटेनमध्येही झोम्बी आजाराने अनेकांचा जीव घेतला आहे. ब्रिटनमध्ये झॉम्बी ड्रगने कहर केला आहे. येथे 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

या लोकांच्या मृत्यूचा थेट संबंध अमेरिकेशी जोडला जात आहे. या ड्रगमुळे हात आणि पायांना जखमा होतात आणि या गंभीर प्रकरणांमध्ये रुग्णाचा मृत्यू देखील होतो. या ड्रगचा औषधाचा जास्तीत जास्त प्रभाव त्वचेवर होतो. शरीराच्या वेगवेगळ्या भागात जखमा दिसू लागतात. यामध्ये संसर्ग वाढतो. रुग्ण झॉम्बीसारखा फिरतो. म्हणूनच याला झॉम्बी ड्रग असेही म्हणतात.

Zombie Drug In Britain
Iran's Zombie Angelinaची जेलमधून सुटका; जगासमोर पहिल्यांदाच आला खरा चेहरा

काय आहे हा ड्रग

Xylazine असं या ड्रगचं नाव आहे. याला ट्रान्क नावानेही ओळखलं जातं. याचा वापर खरंतर पिसाळलेले घोडे किंवा गाईंना शांत करण्यासाठी केला जातो. मात्र, ब्लॅक मार्केटमधून याची विक्री अमली पदार्थाच्या रुपात केली जाते. हेरॉईन किंवा फेंटानील (fentanyl) अशा अमली पदार्थांमध्ये मिक्स करून हे विकलं जातं.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ड्रग डीलर झॉम्बी ड्रग्स कोकेन आणि हेरॉइन सारख्या इतर मादक पदार्थांमध्ये मिसळतात. त्यामुळे त्यांचे औषध घेण्याचे प्रमाण वाढते. त्याचा शरीरावर जास्त परिणाम होतो आणि त्याचा खर्चही कमी होतो. त्यामुळेच त्याचा वापर वाढत आहे.

अंमली पदार्थ विक्रेते त्याचा बिनदिक्कत वापर करत आहेत. अमेरिकन हेल्थ एजन्सी सीडीसीचे म्हणणे आहे की, जेव्हा हे औषध अंमली पदार्थात मिसळून घेतले जाते तेव्हा ते अधिक धोकादायक बनते. हे औषध घेतल्यानंतर व्यक्ती शुद्धीत राहत नाही. शरीरात जखमा दिसू लागतात. हळूहळू ही स्थिती जीवघेणी बनते. (Zombie Drug In Britain)

Zombie Drug In Britain
Revived Ancient ‘Zombie Virus : रशियातून पुन्हा डोकावणार का झोम्बी? सापडला 48,500 वर्षांपूर्वीचा व्हायरस

माणसं होतात झॉम्बी

हे ड्रग घेतल्यानंतर लोकांमध्ये झॉम्बीप्रमाणे लक्षणं दिसून येतात. गेल्या वर्षी अमेरिकेतील काही लोकांचे विचित्र वागतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या लोकांची त्वचा सोलत होती, तसंच त्यांना चालतानाही अडचण येत होती. एखाद्या हॉलिवूडपटातील झॉम्बी ज्याप्रमाणे असतात, अगदी तसेच हे लोक दिसत असल्यामुळे या ड्रगला झॉम्बी ड्रग असं नाव पडलं.

Zombie Drug In Britain
Zombie Virus memes viral : कोरोनापेक्षा घातकी आहे का झोम्बी व्हायरस?, शास्त्रज्ञ-नेटकरी काय म्हणतात?

झॉम्बी शरीरात कसे भिनते?

हा ड्रग शरीरात पोहोचल्यानंतर 20 ते 30 मिनिटांनी त्याचा परिणाम दिसू लागतो. ड्रग घेणारा व्यक्ती भान हरपतो. अनेक तास नशेत राहतो. या काळात ती व्यक्ती तासन्तास त्याच स्थितीत बेशुद्ध राहिल्यास शरीरातील दाब वाढून प्रकृती बिघडते.

या ड्रगच्या सेवनाने जखमांचा धोकाही वाढतो. या ड्रगवर केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की ड्रगचा प्रभाव जितका जास्त तितका धोका जास्त असतो. हा ड्रग घेऊन बेशुद्ध पडलेल्या माणसाचा कधीही मृत्यू होऊ शकतो.

या औषधामुळे रुग्णाला नैराश्य येते. काही प्रकरणांमध्ये, रुग्ण इतके गोंधळून जातात की त्यांना सतत उलट्या होऊ लागतात.

Zombie Drug In Britain
Zombie Drug : झॉम्बी ड्रगचा कहर, थडग्यांमधून मृतदेहांची होतेय चोरी.. आफ्रिकेतील देशामध्ये आणीबाणी जाहीर!

झॉम्बी शरीरात पसरला तर दिसतात ही लक्षणे

हा ड्रग शरीरात पोहोचल्यानंतर काही विशेष लक्षणे दिसून येतात जी प्रकृती अधिकच बिघडत असल्याचे सूचित करतात.

  • जसे की श्वास घेण्यास त्रास होणे,

  • रक्तदाब कमी होणे,

  • हृदयाचे ठोके कमी होणे,

  • शरीरावरील जखमा आणि त्यांचे संक्रमण अधिक वाढणे

अशी लक्षणे दिसू लागल्यास सावध रहा आणि डॉक्टरांशी संपर्क साधा. औषधांच्या ओव्हरडोसच्या प्रकरणांमध्ये रुग्णांना नॅलोक्सोन नावाचे औषध दिले जाते. हे नशेचे परिणाम कमी करण्याचे काम करते. त्यामुळे रूग्णांनी थेट हॉस्पिटलशी संपर्क करावा, असे अवाहन अमेरिकन हेल्थ डिपार्टमेंटे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.